महाराष्ट्र दर्शन न्यूज
देशात इंधनाची दरवाढ आणि खिशाला परवडणारी कार हे समीकरण आता लवकरच जुळणार आहे, असं दिसत आहे. कारण दिग्गज कार निर्माती कंपनी मारुती सुझुकी लवकरच भारतात आपली इको व्हॅन किंवा MPV लाँच करण्याच्या तयारीत आहे.
प्राप्त माहीतीनुसार, 2021-22 या आर्थिक वर्षात 1 लाख 8 हजारांहून जास्त कार विकल्या गेलेल्या MPV श्रेणीतील मारुतीचे इको हे सर्वाधिक विकले जाणारे प्रवासी वाहन ठरले. इको कारला मारुती सुझुकी कंपनीने वर्ष 2010 मध्ये सादर केले होते. ही कार 5-सीटर आणि 7-सीटर अशा दोन्ही व्हेरिएंट मध्ये येते. कारची किंमत एक्स-शोरूम 4.08 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 5.29 लाख रुपयांपर्यंत जाते.
आता तुम्हाला पॉवरट्रेनबद्दल सांगायचं झालं, तर ही कार दोन प्रकारच्या इंजिन पर्यायात म्हणजेच पेट्रोल आणि सीएनजी (CNG) सोबत येऊ शकते. 1.2 लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन पहिल्या व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. सीएनजी किट असलेले हे इंजिन 63Ps पॉवर आणि 85Nm टॉर्क निर्माण करते. कंपनीच्या मते, या कारचे पेट्रोल व्हेरिएंट 16.1 केएमपीएल मायलेज देते आणि सीएनजी व्हेरिएंट 20.88 केएम/केजी मायलेज देते, असं समजतंय.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद