महाराष्ट्र दर्शन न्यूज | मुंबई
खाद्यपदार्थ निर्मिती आणि वितरणातील कोहिनूर फुड्स ही आघाडीची कंपनी आहे. कोहिनूर ब्रँड नावाने कंपनी बासमती तांदळाच्या अनेक प्रजाती विकते. कंपनीचे पुरवठा साखळी नेटवर्क खूप मजबूत असून त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये अनेक नामांकित ब्रँडचा समावेश आहे. बासमती तांदळाव्यतिरिक्त, कोहिनूर कंपनी खाण्यासाठी रेडीमेड करी, रेडीमेड ग्रेव्ही, कुकिंग पेस्ट, चटण्या, मसाले, फ्रोझन ब्रेड, स्नॅक्स आणि खाद्यतेल देखील विकते.
अदानी विल्मरने 3 मे रोजी कोहिनूर ब्रँड विकत घेतल्यापासून कोहिनूर फूड्सचे शेअर्स सतत वाढत आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून अदानी विल्मारच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे.
गेल्या कही महिन्यात मल्टीबॅगर रिटर्न्स देणाऱ्या कोहिनूर फूड्सच्या स्टॉकलाही मंगळवारी अपर सर्किट लागला. हा स्टॉक 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचला. गेल्या एका महिन्यात या शेअरने 132 टक्के मल्टीबॅगर परतावा दिला आहे. 11 एप्रिल 2022 रोजी कोहिनूर फूड्सच्या 1 शेअरची किंमत 8.90 रुपये होती, जी मंगळवार, 10 मे रोजी 20.65 रुपयांवर गेली आहे. मंगळवारी शेअरमध्ये 5 टक्क्यांची अप्पर सर्किट होती.
गेल्या 22 दिवसांत या शेअरच्या किमतीत 102 टक्क्यांनी वाढ झाली आहे. कोहिनूर फूड्सचा स्टॉक गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांमध्ये 20.76 टक्क्यांनी वाढला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने महिनाभरापूर्वी या शेअरमध्ये एक लाख रुपये गुंतवले असतील तर आज त्याची गुंतवणूक 232,002 रुपये झाली आहे.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद