देशभरात अनेक राज्यांमध्ये उष्णतेचा कहर सुरूच आहे. बंगालच्या खाडीमध्ये निर्माण झालेले चक्रीवादळ ‘असनी’ची तीव्रता आता कमी झाली आहे. ‘असनी’ चक्रीवादळाच्या प्रभावामुळे पूर्वेकडील वाऱ्यांनी उष्णतेपासून वाचवले आहे. त्यामुळे लवकरच दिलासा मिळू शकतो तर काही ठिकाणी पावसाचा इशाराही भारतीय हवामान खात्याने दिला आहे.
असनी चक्रीवादळाचा परिणाम आजदेखील काही प्रमाणात दिसत आहे. आताच्या घडीला पश्चिम किनारपट्टी ढगाळ आहे. वादळाचा परिणाम म्हणून केरळ किनारपट्टी, कर्नाटक, गोवा, कोकण यासोबतच मुंबई, ठाणे आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत वातावरण ढगाळ राहणार असून वाऱ्यासह काही भागामध्ये पाऊस हजेरी लावणार असल्याची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात सांगायचं झालं तर विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात काही परिसरात गडगडाट, कडकडाट होऊन हलक्या सरी पडतील, असा पाऊस होऊ शकतो. आज भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, काही ठिकाणी हलका पाऊस पडणार असला तरी उद्या (दि. 13 मे) चंद्रपूर आणि वर्धा या जिल्ह्यांना हवामान विभागाकडून उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट दिला आहे. यानंतर 16 मे च्या नंतर सुद्धा राज्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
अंदमानच्या समुद्रावर 13 ते 19 मे मध्ये मॉन्सून धडकणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरवर्षी अंदबारमध्ये 22 मे च्या जवळपास दाखल होणारा मॉन्सून यावेळेस मात्र वेळेपूर्वीच दाखल होणार आहे. तळकोकणात 27 मे ते 2 जूनपर्यंत दाखल होण्याचा अंदाज आहे. 21 मे रोजी मॉन्सून केरळच्या किनारपट्टीवर दाखल होऊ शकतो. मग यानंतर तो पुढील काही दिवसामध्ये भारताच्या इतर भागात पसरू शकतो, असा अंदाजही या संस्थेने वर्तवला आहे.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद