Facebook बंद करणार ‘हे’ दोन फीचर्स

0



फेसबुक (Facebook) लवकरच काही फीचर्स बंद करणार आहे. फेसबुकचं नियरबाय फ्रेंड्स फीचर 31 मे पासून उपलब्ध होणार आहे. या फीचरद्वारे लोकांना फेसबुक युजर्ससह आपलं सध्याचं लोकेशन शेअर करता येत होतं. कंपनीने युजर्सला नियरबाय फ्रेंड्स फीचर (Nearby Friends) आणि इतर लोकेशन बेस्ड फीचर्स बंद होण्याबाबत सूचित केलं आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील युजर्सच्या अहवालानुसार, मेटा-मालकीच्या कंपनीने नियर फ्रेंड्स आणि इतर लोकेशन फीचर्स बंद करणार आहे.

आम्ही फेसबुकवरील काही स्थान-आधारित वैशिष्ट्ये कमी वापरामुळे काढून टाकत असलो तरीही युजर्सची स्थान माहिती कशी गोळा केली जाते आणि वापरली जाते हे जाणून घेण्यासाठी लोक लोकेशन सर्व्हिसचा वापर करू शकतात, असे कंपनीने फीचर्स बंद करताना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

वेदर अलर्ट, लोकेशन हिस्ट्री, बॅकग्राउंड लोकेशनसह इतर लोकेशन बेस्ड फंक्शनदेखील फेसबुकवरुन हटवण्यात येणार आहेत. कंपनीने युजर्सला लोकेशन हिस्ट्रीसह आपला डेटा डाउनलोड करण्यासाठी 1 ऑगस्टपर्यंतचा वेळ दिला आहे.

लोकांसाठी या सुविधा बंद असल्या तरीही याचा अर्थ असा नाही की कंपनी लोकेशन डेटा गोळा करणे पूर्णपणे बंद करेल. फेसबुकने सांगितले की, ते जाहिराती देण्यासाठी आणि त्यांच्या डेटा धोरणाच्या अनुषंगाने इतर अनुभवांसाठी स्थान चेक-इन देण्यासाठी लोकेशन  माहिती गोळा करणे सुरू ठेवेल.

Source

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top