तुम्ही जर बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये व्यवहार करण्यासाठी जात असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. कारण, बँक आणि पोस्ट ऑफिसचे पैशांच्या व्यवहाराबाबत काही नियम बदलले आहेत. केंद्र सरकारने आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामार्फत आता नवे नियम जारी झाले आहेत.
सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेज CBDT ने इनकम टॅक्स संशोधन अधिनियम 2022 अनुसार बँकिंग व्यवहारासंबंधित काही नियमांमध्ये बदल केला आहे. या नियमांची आधीसूचना 10 मे 2022 पासून जारी करण्यात आली आहे. रोखीच्या व्यवहारांची माहीती घेण्यासाठी सरकारने आधीच्या नियमांत बदल केले आहेत. या नियमांची अंमलबजावणी 26 मे 2022 पासून करण्यात येणार असल्याचं सांगितलं जातंय.
नव्या नियमानुसार आता बँक किंवा पोस्ट ऑफिसमधून एका ठराविक मर्यादेपेक्षा जास्त पैसे काढण्यासाठी पॅन कार्ड आणि आधार कार्डची माहिती देणे बंधनकारक असेल. एका आर्थिक वर्षात बँकांशी मोठ्या प्रमाणात व्यवहार करण्यासाठी पॅन क्रमांक देणे किंवा आधारची बायोमेट्रिक पडताळणी करणे यापुढे सर्वांना अनिवार्य असणार आहे.
सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेजने दिलेल्या माहितीच्या आधारे..
आता नव्या नियमानुसार, बँकेत यापुढे चालू खाते (Current Account) आणि बचत खाते (Saving Account) उघडण्यासाठी पॅन कार्डची गरज लागेल. बँकेत खाते असणाऱ्या ज्या ग्राहकांनी यापूर्वीच पॅन लिंक केले असेल, तर त्यांनासुद्धा बँकेत रोख रक्कम जमा करताना वरील नियमांचे पालन यापुढे देखील करावे लागणार आहे.
जर एक आर्थिक वर्षात कोणत्याही बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये 20 लाख किंवा त्यापेक्षा अधिक रुपयांची रक्कम जमा केल्यास तुम्हाला आता पॅन कार्ड (PAN card) व आधार कार्डचा तपशील द्यावा लागणार आहे. याशिवाय खात्याची माहिती द्यावी लागू शकते. नव्या नियमांमुळे आर्थिक व्यवहारांमध्ये अधिक पारदर्शकता येणार असून यामुळे सरकारला करचोरी शोधणे सोपे होणार असून केंद्र सरकारने या नियमांविषयी आधीपासूनच तयारी केली होती.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद