उन्हाळा आला की, फळांचा राजा आंबा बाजारात सर्वत्र उपलब्ध होतो. आंबा बहुतेकांना खूप आवडतो, काहीजण तर रात्रंदिवस आंबं खात असतात. भात, रोटी किंवा पराठेही अनेक ठिकाणी आंब्यासोबत खाल्ले जातात. तुम्हीही आंब्याचे मोठे चाहते असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. पण तुम्हाला माहित आहे का की, आंबा खाल्ल्यानंतर काही पदार्थ कधीही खाऊ नयेत, नाहीतर आपल्याला अनेक गंभीर आजार होऊ शकतात. जाणून घेऊया आंबा खाल्ल्यानंतर कोणते पदार्थ खाऊ नयेत.
- आंबा खाल्ल्यानंतर कोल्ड्रिंक अजिबात पिऊ नयेत. आंबा आणि कोल्ड्रिंक एकत्र घेतल्यास पोटात घातक रिअॅक्शन निर्माण होऊ शकते.
- आंबा खाल्ल्यानंतर लगेच दही खाऊ नये. कारण, आंबा आणि दही मिळून पोटात जास्त कार्बन डायऑक्साइड तयार होतो. त्यामुळे आपल्याला पोटाचा त्रास होऊ शकतो.
- पाणी (Water)- खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे योग्य मानले जात नाही. खाल्ल्यानंतर तहान नक्कीच लागते, पण काही वेळ थांबून पाणी पिणे चांगले. आंबा खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास पोटाला ते पचण्यास त्रास होतो. त्यामुळे गॅस, छातीत जळजळ यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
- तिखट आणि मसालेदार अन्नापासून दूर राहा (Spicy Food)- साधारणपणे उन्हाळ्यात अन्न खाल्ल्यानंतर लोकांना आंबा खायला आवडतो. मात्र, ही सवय योग्य नाही. तिखट आणि मसालेदार जेवणानंतर आंबा खाल्ल्याने पोटदुखी किंवा छातीत जळजळ होऊ शकते. यासोबतच मुरुमांसारख्या समस्याही सुरू होऊ शकतात.
- कारले आणि आंबा एकत्र खाल्ल्याने पोटाचा त्रास होऊ शकतो. आंबा खाल्ल्यानंतर लगेच कारले खाल्ल्याने उलट्या, मळमळ आणि श्वासोच्छवासाचा त्रास होऊ शकतो.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद