ब्रेकींग: ‘केजीएफ’ चित्रपटातील अभिनेत्याचे निधन, सिनेसृष्टीतील सर्वात दुःखद बातमी..!

0



KGF Chapter 2 फेम अभिनेता मोहन जुनेजा यांचे आज 7 मे 2022 रोजी सकाळी निधन झाले. अभिनेते आणि कॉमेडियन मोहन जुनेजा यांनी जगाचा निरोप घेऊन आपल्या कुटुंबाला, चाहत्यांना, मित्र परिवाराला मोठा धक्का दिला आहे. सुप्रसिद्ध अभिनेते मोहन जुनेजा यांच्या पार्थिवावर आज शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

मोहन जुनेजा (mohan juneja) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. मागील काही दिवसांपासून आजारी असल्याने त्यामुळे तब्येत खालावल्याने बंगळुरुमधील एका खाजगी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. मोहन जुनेजाची दाक्षिणात्य सिनेमांत विनोदी अभिनेता म्हणून ओळख होती. त्यानं आपल्या विनोदाच्या अचूक टायमिंगनं प्रेक्षकांना नेहमीच हसवलं आहे.

मोहन जुनेजा यांनी एक कॉमेडियन म्हणून आपल्या आयुष्याच्या महत्वाच्या टप्प्यातील म्हणजेच करिअरची सुरुवात केली. त्यांनी केजीएफ (KGF) मध्ये पत्रकार आनंदच्या इन्फॉर्मरची भूमिका साकारली होती. मोहननं तामिळ,तेलगू, मल्याळम, हिंदी भाषिक सिनेमातून काम केलं आहे. आतापर्यंत मोहनने 100हून अधिक सिनेमांत काम केलं होतं.

अभिनेते मोहन जुनेजा यांच्या निधनानंतर दाक्षिणात्य इंडस्ट्रीमधील त्यांचे अनेक कलाकार मित्र आणि चाहते सोशल मीडियावर दुःख व्यक्त करीत आहेत. मोहन जुनेजा यांना लहानपणापासूनच अभिनेता बनायचं स्वप्न पाहिलं होतं. आपल्या कॉलेजच्या दिवसांतही ते नाटकातून कामं करायचे. 2008 मध्ये आलेला रोमॅंटिक कॉमेडी सिनेमा ‘संगमा’ मधनं त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली. ते विशेषतः कन्नड चित्रपटांसाठी ओळखले जायचे. यासोबतच अनेक मालिकांमध्येही त्यांनी अभिनय केला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top