महाराष्ट्र दर्शन न्यूज
केंद्र आणि राज्य सरकार जनतेसाठी नियमित नविनविन योजना राबवित आहेत. तरुण, सुशिक्षित, बेरोजगार यांच्यासाठी नवीन रोजगाराच्या संधी घेऊन सरकार नियमितपणे येते. तसेच केंद्र सरकारची ही ई श्रम कार्ड योजना सुरू करण्यामागे असंघटित वर्गाला आर्थिक बळकटी देणे हा उद्देश आहे.
काय आहे ई श्रम कार्ड :- असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचा एक राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्यासाठी भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयानं ई-श्रम पोर्टल विकसित केलं आहे. या पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर संबंधित कामगाराला ई-श्रम कार्ड दिलं जाणार आहे.
पात्रता :- देशाच्या कोणत्याही कोपऱ्यात काम करणारे असंघटित क्षेत्रातील कामगार ई-श्रम कार्डसाठी अर्ज करू शकतात. बांधकाम क्षेत्रातील कामगार, स्थलांतरित मजूर, फेरीवाले, घर कामगार, स्थानिक रोजंदारी कामगारांसह, भूमिहीन शेतमजूर व इतर काही असंघटित कामगारांची नोंदणी या संकेतस्थळावर करता येणार आहे.
नोंदणीसाठी वय :- ई-श्रम कार्डसाठी वय 16 वर्षांपेक्षा जास्त आणि 59 वर्षांपर्यंतचा कोणताही कामगार पोर्टलवर स्वतःची नोंदणी करू शकतो. या वयामधील कोणतीही व्यक्ती कार्ड बनवू शकते.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद