राज्यातील वाहनधारकांसाठी पुन्हा एकदा आनंदाची बातमी आली आहे. मोदी सरकारने शनिवारी (ता. 21) पेट्रोल व डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात कपात केली होती. त्यानंतर ठाकरे सरकारवर कर कपात करण्यासाठी दबाव वाढला होता. अखेर ठाकरे सरकारनेही इंधन दराबाबत आज (ता. 22) मोठा निर्णय घेतला..
केंद्र सरकारने शनिवारी पेट्रोलच्या दरात 8 रुपये, तर डिझेलच्या दरात 6 रुपयांनी कपात केली होती. तसेच राज्यांनीही पेट्रोल व डिझेलवरील ‘व्हॅट’ कमी करावे, असे आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले होते. त्यास प्रतिसाद देताना, राजस्थान व केरळने पेट्रोल-डिझेलच्या ‘व्हॅट’मध्ये कपात केली.
देशातील इतर राज्ये पेट्रोल-डिझेलवरील करात कपात करीत असताना, महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवरही दडपण वाढले होते.. विरोधकांकडून सातत्याने कर कमी करण्याची मागणी होत होती. अखेर राज्य सरकारनेही आज पेट्रोल-डिझेलच्या ‘व्हॅट’मध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला..
‘व्हॅट’ कमी करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर मुंबईत पेट्रोल 109 रुपये 27 पैसे प्रतिलिटर दराने उपलब्ध होईल, तर डिझेल 95 रुपये 84 पैसे प्रति लिटर या दराने मिळणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, महागाई कमी होण्यास मदत होणार आहे..
दरम्यान, केरळ सरकारने शनिवारी (ता. 21) पेट्रोल व डिझेलवरील राज्य कर अनुक्रमे 2.41 रुपये व 1.36 रुपये प्रति लिटर कमी केला. राजस्थान सरकारने पेट्रोलवरील व्हॅट 2.48 रुपये, तर डिझेलवरील 1.16 रुपयांनी कमी केलाय. ओडिशा सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील कर अनुक्रमे 2.23 रुपये आणि 1.36 रुपये प्रति लिटरने कमी केले आहेत.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद