महाराष्ट्र दर्शन न्यूज / निघोज
जनता दल (सेक्युलर ) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व रांजणगाव एम आय डीसी परिसरातील एक यशस्वी उद्योजक नाथाभाऊ शेवाळे यांनी पारनेर तालुक्यातील निघोज येथील राज्यातील जागृत देवस्थान असलेल्या श्री. माता मळगंगा देवीचे दर्शन घेतले. तसेच शनिवार दिनांक २१ रोजी प्रगतीशील शेतकरी व खंडोबा देवस्थान ट्रस्टचे मार्गदर्शक विठ्ठलराव लंके यांचे चिरंजीव विशाल विठ्ठलराव लंके यांच्या विवाह प्रसंगी लंके कुटुंबाची आवर्जून भेट घेत वधू वरास शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रगतीशील शेतकरी व खंडोबा देवस्थान ट्रस्टचे मार्गदर्शक विठ्ठलराव लंके यांनी नाथाभाऊ शेवाळे यांचा मळगंगा ट्रस्टच्या वतीने सत्कार केला. यावेळी शिरूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजयजी बारहाते, सेवानिवृत्त मुख्याध्यापक देवीदास लंके सर, निघोज व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी दत्तात्रय बाबाजी (आण्णा )लंके मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे व्यवस्थापक महेश ढवळे, पारनेर तालुका फोटोग्राफर संघटनेचे मार्गदर्शक संतोषजी पंदारे, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे ज्येष्ठ लेखणीक बाळासाहेब साळवे आदी उपस्थित होते.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद