मोदी सरकारने पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्कात (Excise Duty) मोठी कपात केल्याने आज देशभर पेट्रोल व डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात कमी झाले. त्यानंतर महागाईने त्रासलेल्या जनतेसाठी मोदी सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतलाय.
पेट्रोल-डिझेल व गॅसनंतर केंद्र सरकारने आणखी वस्तूंच्या करात कपात केलीय. त्यानुसार स्टील उत्पादनातील तीन प्रमुख कच्च्या मालावर, तसेच प्लास्टिक वस्तूंच्या निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या तीन उत्पादनांवरील आयात शुल्क (Import Duty) कमी करण्यात आले आहे. हे नवे दर आजपासूनच (22 मे) लागू होणार आहेत.
प्लॅस्टिकवरील (Plastic) सीमा शुल्कात कपातीची घोषणा करताना, अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, की “आयातीवर अवलंबून असलेला कच्चा माल आणि मध्यस्थांवर शुल्क कमी केले आहे. त्यामुळे उत्पादनांच्या किंमत कमी होतील व महागाई कमी होण्यास मदत होईल.”
दरम्यान, कच्च्या मालावरील आयातशुल्क कमी करताना, अर्थ मंत्रालयाने लोखंड व स्टीलच्या 11 उत्पादनांवरील निर्यात शुल्क वाढवले आहे. स्थानिक बाजारात लोह खनिजाची उपलब्धता वाढवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.
लोह खनिज व त्याच्या कॉन्स्नट्रेट्सवरील निर्यात शुल्क 30 टक्क्यांवरुन 50 टक्के केलं आहे. 58 टक्क्यांपेक्षा जास्त लोह सामग्री असलेल्या सर्व उत्पादनांवर हे निर्यात शुल्क लागू असेल.. लोखंड व प्लेट्सवर 45 टक्के निर्यात शुल्क केलंय. आतापर्यंत त्यावर कोणताही कर नव्हता. लोखंड व नॉन-अलॉय स्टीलच्या शीट्सवरही 15 टक्के निर्यात शुल्क केलं आहे.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद