बिबट्याच्या हल्ल्यात ५ मेंढ्यांचा मृत्यू ; या गावात घडली घटना

0



महाराष्ट्र दर्शन न्यूज / पारनेर - पिंपरी जलसेन

पारनेर तालुक्यातील पिंपरी जलसेन येथील शेतकरी मच्छिंद्र नानाभाऊ शेळके यांच्या पाळीव शेळ्या व मेंढ्यांच्या कळपावर बिबट्याने हल्ला केला.

शेळके हे आपल्या पाळीव शेळ्या व मेंढ्यासह काळेवस्तीनजिक शेतात रात्रीच्या मुक्कामास होते. बुधवारी सांयकाळ पासून पावसाची रिमझिम सुरूच होती. त्यामुळे शेतकऱ्यांचे पाळीव कुत्रे देखील आडोशाला बसले होते. अश्यातच अज्ञात वन्य प्राण्याने या कळपावर हल्ला केल्याने शेळ्यांचा ओरडण्याचा आवाज आल्याने कुत्र्याच्या भुंकण्याच्या आवाजाने हा प्रकार शेतकऱ्यांच्या लक्षात आला. 

सविस्तर वृत्त : बुधवारी रात्री सुरू असलेल्या रिमझिम पावसात बिबट्याने शेळ्या व मेंढ्यांच्या कळपावर हल्ला केला. यामध्ये ५ मेंढ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी (दि २२) मध्यरात्री पारनेर तालुक्यातील पिंप्री जलसेन येथे घडली. सुमारे ३० ते ३५ हजारांची नुकसान शेतकऱ्याची झाली असून तातडीने शासनस्तरावरून मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. घटनास्थळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ झावरे व वनविभागाचे अधिकारी यांनी भेट देऊन पंचनामा केला.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top