नारायणगव्हाण चौपद्रिकरणासाठी होणार नव्याने भूसंपादनाचा प्रस्ताव

0



महाराष्ट्र दर्शन न्यूज / पारनेर- नारायणगव्हाण

नगर-पुणे महामार्गावरील नारायणगव्हाण चौपद्रिकरणाचे काम काही तांत्रिक कारणांमुळे प्रलंबित राहील्यामुळे गावातील शाळकरी विदयार्थी, अबाल वृद्ध, गावकऱ्यां बरोबरच प्रवाशांनाही मोठा धोका पत्करून प्रवास करावा लागत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित रस्त्यामाठी ग्रामस्थ सातत्याने शासनदरबारी पाठपुरावा करत आहोत निवेदन, उपोषण, रास्ता रोको, टोलबंद आंदोलन अशा विविध मार्गाने प्रशासनाचे लक्ष वेधण्याचे काम आंदोलनकर्ते, ग्रामस्थांकडून करण्यात आले. प्रशासनाने मागील आंदोलनाच्या वेळी अर्धवट रस्त्याचे काम गावांपर्यंत करत सुरक्षिततेसाठी प्रयत्न केले परंतु उर्वरित रस्ताचा प्रश्न प्रलंबितच राहीला त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी पुन्हा नव्याने प्रशासणाकडे नागरिकांच्या सुरक्षिततेसह अपुर्ण रस्त्यामुळे गावाची थांबलेली प्रगती यासाठी पाठपुरावा सुरु केला असून याची दखल घेत प्रशासणाने तातडीने रस्त्यावरच्या सुरक्षिततेच्या कामांसोबतच नारायणगहाण चौपद्रिकरणाच्या भुसंपादनाचा नव्याने सुधारीत प्रस्ताव बनवण्यासाठी रस्त्यालगतच्या मिळकतींचे उतारे जमा करण्याचे पत्र ग्रामसेवक तलाठी यांना देण्यात आले असुन याकामी रस्त्याबरोबरच पुढील भुसंपादनाचा योग्य मोबदला जागा मालकांना मिळवण्यासाठी शासणदरबारी पाठपुरावा करत राहणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

नारायणगव्हाण चौपद्रिकरणासह,महामार्गांवरील सतत घडणारे अपघात रोखण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करतच राहणार त्याचबरोबर अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्या देवदुतांचा शासकीय पातळीवर सन्मान करण्यासाठी पुढाकार घेणार-  शरद पवळे( सामाजिक कार्यकर्त)

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top