महाराष्ट्र दर्शन न्यूज / निघोज / सागर आतकर
पारनेर तालुक्यातील निघोज येथे आमदार निलेश लंके महिला कल्याणकारी संस्थेच्या वतीने मोफत शिवणकाम व मोफत ब्युटी- पार्लर प्रशिक्षण वर्गाची सुरुवात माजी जि,प सदस्या राणीताई लंके यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. महिला सबलीकरण व ग्रामीण भागातील महिलांना रोजगार उपलब्ध करण्याच्या हेतूने महिला कल्याणकारी संस्थेची स्थापना झाली.
महिलांनाचे संघटन करून त्यांना रोजगार उपलब्ध होऊन त्यांना सक्षम करण्यासाठी संस्थेच्या अध्यक्षा सविता ढवळे, संचालिका संजीवनी लामखडे, मयूरी औटी, शीतल गोडसे, पल्लवी काळे, जयश्री पठारे, कविता लंके, तबस्सुम हवालदार, कविता शिर्के, सीमा पवार, परिश्रम घेतले.
या उद्घाटन प्रसंगी ग्रामपंचायत सदस्या सुधामती कवाद, भावना साळवे, मनीषा घोगरे, छाया लामखडे, सीमा वराळ, जया वराळ, प्रतिभा लाळगे, मनीषा लाळगे, वंदना तनपुरे, शलिनी लाळगे, स्वाती कवाद,अर्चना घोगरे, रूपाली लंके, कोमल लंके, वर्षा आतकर, प्रमिला लंके, स्वाती लंके, अर्चना लंके, जयश्री लंके, गीता लंके, संपदा उनवणे आदी उपस्थित होते.
आमदार निलेश लंके महिला कल्याणकारी संस्थेच्यावतीने पारनेर तालुक्यातील महिलाना सक्षम करण्यासाठी कर्जपुरवठा, ब्युटी पार्लर, शिवणकाम प्रशिक्षण वर्ग उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमामध्ये जास्तीत जास्त महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा सविता ढवळे व संचालिका कविता लंके यांनी केले आहे.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद