शिरूर तहसिल कार्यालयावर पाण्यासाठी मोराची चिंचोली ग्रामस्थांचा धडक मोर्चा

0



महाराष्ट्र दर्शन न्युज / शिरूर-मोराची चिंचोली

मोराची चिंचोली येथे पाण्यावाचून नागरीकांचे तसेच तेथे असणाऱ्या प्राण्यांबरोबर राष्ट्रीय पक्षी मोर यांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने गावासाठी कायमस्वरूपी पाण्याची उपलब्धता होण्यासाठी ग्रामस्थांनी तेथील ग्रामदेवत खंडोबाच्या मंदीरात जागरण गोंधळ घालत शिरूर तहसिल कार्यालयात धडक मोर्चा काढला होता.  

शिरूर तालुक्यातील चिंचोली मोराची हे गाव शासणाने "क" दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून घोषित केले आहे.

कित्येक वर्षापासून चिंचोली गावात शेतीसाठी पाणी, पिण्यास पाणी उपलब्ध नाही. शेतकऱ्यांना शेतीसाठी पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. चिंचोलीच्या जवळच्या परिसरात अवघ्या काही अंतरावर दोन्ही बाजुला कॅनॉलचे पाणी जाऊन सुद्धा या गावाला त्याचा फायदा होत नाही. चिंचोली गावाला पावसाळा सोडला तर शेतीला काय पिण्यास ही पाणी नसते. गावात अनेक दिवसांपासुन मोर आहे. घरातल्या मुलांना जपावे तशी गावकरी मोरांची काळजी घेत आहे. पण अन्न, पाणी नसल्यामुळे काही मोराचे स्थलांतरित झाले आहे. पुढील काळात अशीच परिस्थिती राहिल्यावर मोरांसोबत नागरीकांनाही पाणी नसल्यामुळे स्थलांतरित व्हावे लागेल.

समस्त चिंचोलीकर यांची शासनाला विनंती आहे की, आमच्या गावाकडे लक्ष देऊन कॅनॉलचे पाणी गावाला मिळवून देण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. या भागातील खासदार, आमदार पाण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी दुर्लक्ष करत असून पिण्याच्या पाण्यावाचून मानवाबरोबर येथे वास्तव्यास असणाऱ्या मोरांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी तहसिलदारांना याबाबत लेखी निवेदन देण्यात आले. यावेळी निवेदन देण्यासाठी मोराची चिंचोलीवरून थेट वाजतगाजत घोषणा देत हा मोर्चा तहसिल कार्यालयात धडकला होता.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top