उमेदवारी मिळत असेल तरच समविचारी पक्षासोबत अन्यथा पंचायत समीती निवडणूक अपक्ष लढविण्याचा शिवबा संघटनेचा निर्धार.

0



महाराष्ट्र दर्शन न्युज / निघोज

शिवबा संघटनेच्या माध्यमातून गेली दहा वर्षे सामाजिक कामांच्या माध्यमातून लोकसंपर्क मोठ्या प्रमाणात वाढला असून समाजकारणाचा राजकारणाची जोड देत लोकांचें प्रश्न अधिक तप्तरतेने सोडवीण्यासाठी निघोज पंचायत समिती गणातून निवडणूक लढविण्याचा निर्णय शिवबा संघटनेने घेतला असून यासंदर्भात निघोज जवळा रस्त्यानजीक असणाऱ्या हॉटेल नक्षत्र समोरील पुष्कर लॉन्स येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे यांनी यासाठी उमेदवारी करुन एखाद्या पक्षात जायचे की अपक्ष निवडणूक लढवायची याचा निर्णय शेटे यांना देण्याचा अधिकार सर्वानुमते घेण्यात आला. या मेळाव्यास शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले, शिवाजी लाळगे, बबनराव ससाणे, पिराजी पवार, दत्तात्रय कवाद, बाबाजी तनपुरे हे शिवसैनिक आवर्जून उपस्थित होते. 



तसेच उपसरपंच माऊली वरखडे, जय बजरंग मंडळाचे मार्गदर्शक अर्जुन लामखडे, राजु लाळगे, शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे, शंकर पाटील वरखडे, निलेश वरखडे, रमेश वाजे, मेजर अमोल ठुबे, स्वप्नील लामखडे, मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे विश्वस्त विश्वास शेटे, मच्छींद्र लाळगे, यश राहाणे, अल्पसंख्याक समाजाचे नेते मनोहर राउत, खंडू लामखडे आदी तसेच पंचायत समिती गणातील निघोज, वडनेर, देवीभोयरे, पठारवाडी तसेच पारनेर तालुक्यातील विविध गावांतील शिवबा संघटनेचे दोनशे पेक्षा जास्त कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शिवसेना पक्षाचे जिल्हा उपप्रमुख रामदास भोसले यांनी शिवसेना पक्षाची भूमिका सांगितली तसेच २०१२ ते १७ या कालावधीत निघोज अळकुटी जिल्हा परिषद गटातील शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्याने केलेल्या विकासकामांची माहिती सांगितली. शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे यांनी गेली दहा वर्षात सामाजिक कामांच्या माध्यमातून केलेल्या युवकांच्या संघटनांचे भोसले यांनी कौतुक केले. पंचायत समीतीची उमेदवारी देण्याचा अधिकार आपल्याला असला तरी शेटे यांच्या पेक्षा प्रबळ उमेदवार पक्षात आला तर संघटनात्मक तुलनात्मक विचार होईल असे स्पष्ट करीत शिवसेनेची उमेदवारी योग्य वेळी जाहीर करणार असल्याचे सांगितले. यावेळी शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे यांनी आपल्या भाषणातून शिवबा संघटनेने गेली दहा वर्षात मोठ्या प्रमाणात सामाजिक काम केले आहे. मात्र समाजकारणाला राजकारणाची जोड देऊन लोकांचे प्रश्न अधिक कार्यक्षमतेने सोडविण्यासाठी पंचायत समिती निवडणूक निघोज गणातून लढवण्याचा आग्रह शिवबा संघटनेचे कार्यकर्ते आपणाला करीत असल्याने मिटिंगचे आयोजन केले होते. मात्र सहकारी मोठ्या प्रमाणात आल्याने मेळाव्याचे स्वरूप आले. शिवसेनेने उमेदवारी देण्याचा शब्द दिला तरच शिवसेना अन्यथा अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्धार या मेळाव्यात जाहीर केला आहे. उपस्थित शिवबा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी टाळ्या वाजवून शेटे यांच्या निर्णयाला संमती दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top