नवकुंडात्मक नवचंडी याग महायज्ञ (NAVCHANDI YAG MAHAYADNYA) सोहळ्यास हजारो उस्फूर्त प्रतिसाद

0



महाराष्ट्र दर्शन न्यूज / पारनेर - निघोज / सागर आतकर

पारनेर तालुक्यातील निघोज येथील कुंड पर्यटन क्षेत्र कुंड माऊली मळगंगा माता मंदिर येथे नवकुंडात्मक नवचंडी याग महायज्ञ (NAVCHANDI YAG MAHAYADNYA) सोहळ्यास हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये सुरुवात झाली आजचा या सोहळ्याचा पाचवा दिवस मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे कोषाध्यक्ष ज्ञानदेव लंके यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या कार्यक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे. 


हा सोहळा दिनांक ८ जून ते १४ जून दरम्यान संपन्न होणार आहे. या महायज्ञासाठी आचार्य विवेक पारेकर यांच्या पौराहित्याखाली ह.भ.प राजेश दादा सारंग व पोपटकाका देशपांडे यांच्या सहकार्याने संपन्न होत आहे. परतेक दिवशी होमहवन, महाआरती, महाप्रसाद, अभिषेक,वस्र, अर्चन, जागर असे धार्मिक कार्यक्रम संपन्न होत असून हजारो भाविक या कार्यक्रमासाठी उपस्थित असतात.

या प्रसंगी ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांनीही सपत्नीक मळगंगा देवीचे दर्शन घेतले.

यावेळी आचार्य विवेक पारेकर यांनी पाचव्या दिवशीचे महायज्ञाचे महत्व संगितले. 

या कार्यक्रम प्रसंगी निघोज पंचक्रोशीतील तसेच अहमदनगर, पुणे जिल्ह्यातील हजारो भाविक पूजेसाठी उपस्थित होते.

 

उपस्थित हजारो भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची सांगता ही कोमलताई पाटोळे (KOMALTAI PATOLE) व आमलेशभाऊ जावळकर (AMLESHBHAU JAWALKAR) यांच्या देवी व खंडोबा देवाच्या गाण्यांनी होणार आहे. तरी मळगंगा देवीच्या भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे कोषाध्यक्ष ज्ञानदेव नामदेव लंके यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top