परमेश्वराची आराधना केल्याने परमेश्वर आपल्याला कोणत्या ना कोणत्या रूपाने आशीर्वाद देतोच- आ.निलेश लंके

0

महाराष्ट्र दर्शन न्यूज / पारनेर - निघोज / सागर आतकर

पारनेर तालुक्यातील निघोज येथील कुंड पर्यटन क्षेत्र येथे असलेल्या मळगंगा माता मंदिरामद्धे नवकुंडात्मक नवचंडी याग महायज्ञ (NAVCHANDI YAG MAHAYADNYA) सोहळ्यास हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये सुरुवात झाली आज या सोहळ्याचा सहावा दिवस असून मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे कोषाध्यक्ष ज्ञानदेव लंके यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या या कार्यक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कार्यक्रम प्रसंगी आमदार निलेश लंके यांनीही मळगंगा देवीचे दर्शन घेतले.

 


मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे कोषाध्यक्ष ज्ञानदेव लंके यांनी मळगंगा कुंड परिसरामध्ये नवकुंडात्मक नवचंडी याग महायज्ञाचे आयोजन करून जनतेला आशीर्वाद मिळावे यासाठी चांगले प्रयत्न केले आहेत. गेली अनेक वर्षापासून ज्ञानदेव लंके व त्याचे सहकारी मळगंगा देवीची मनोभावे भक्ति करत आहेत. श्री माता मळगंगा देवीचा महिमा संपूर्ण राज्यात माहीत आहे. असा हा नवचंडी सोहळा तालुक्यात कोणी केला नाही. परंतु ज्ञानदेव लंके यांच्या सहकारी, ग्रामस्थ, भाविक यांच्या सहकार्याने हा यज्ञ केला असून यामुळे जनतेला आशीर्वाद मिळण्याचे पुण्यकर्म लंके यांना प्राप्त झाले आहे असे आमदार निलेश लंके यांनी महाराष्ट्र दर्शन न्यूजशी बोलताना संगितले.

नवचंडी यज्ञास प्रारंभ केल्यापासुन पावसाला सुरुवात झाली आहे. ती आज नवचंडी यज्ञाचा सहावा दिवस आहे ढगांच्या गडगडटासह पाऊस सुरू आहे. आई मळगंगा माते अशीच कृपा आपल्या भक्तांवर ठेव या निघोज ग्रामस्थ यांना दीर्घाआयुष्य मिळूदे अशी मळगंगा माते चरणी प्रार्थना करतो असे आचार्य विनोद पारेकर यांनी महाराष्ट्र दर्शन न्यूजशी बोलताना आपल्या प्रतिक्रिया दिल्या.

या कार्यक्रम प्रसंगी निघोज पंचक्रोशीतील तसेच अहमदनगर, पुणे जिल्ह्यातील हजारो भाविक पूजेसाठी उपस्थित होते. उपस्थित हजारो भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाची सांगता ही कोमलताई पाटोळे (KOMALTAI PATOLE) व आमलेशभाऊ जावळकर (AMLESHBHAU JAWALKAR) यांच्या देवी व खंडोबा देवाच्या गाण्यांनी होणार आहे. तरी मळगंगा देवीच्या भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा तसेच ज्यांना या महायज्ञ सोहळ्यात सहभागी होण्याची इच्छा असेल त्यांनी आपली नावे मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्ट येथे नोंदवावी असे आवाहन मळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे कोषाध्यक्ष ज्ञानदेव नामदेव लंके यांनी केले आहे. 



Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top