महाराष्ट्र दर्शन न्युज / पारनेर
संजय गांधी निराधार योजनेबाबत पारनेर तहसीलदार साहेबानी एक आदेश काढला व सर्वसामान्यांची धांदल उडाली आहे. याबाबत पडताळणी जरूर व्हावी मात्र कुणी निराधार होणार नाहि याचीही काळजी प्रशासनाने घ्यायला हवी. म्हणूनच याबाबत शिवबा संघटनेच्या वतीने विविध मागण्यांचे पत्र तहसिल कार्यालयाला देण्यात आले आहे. या निवेदनात सर्वसामान्य जनतेला येत असलेल्या अडचणी निदर्शनास आणून देण्यात आल्या.
यामध्ये प्रामुख्याने हयातीचा दाखला देण्याची जबाबदारी निश्चितीसाठी व उत्पन्नाचा तलाठिचा दाखला ग्राह्य धरण्याबाबत मागणी करण्यात आली. व ज्याना शक्य नाहि त्याच्या घरी जाऊन यंत्रणेने पाठपुरावा करण्याबाबत मागणी केली. याबाबत शिवबा संघटनेच्या बैठकीत या निराधाराना कोणत्याही बाबतीत अडचण येणार नाही याबाबत नियोजन करण्यात आले. प्रशासनाकडुन जर कोणी निराधार राहिला तर मात्र शिवबा संघटना त्यांच्याबरोबर उभी राहिल.
यावेळी शिवबा संघटना अध्यक्ष अनिल शेटे,पारनेर शहर प्रमुख निलेश दरेकर, नवशाद पठाण, जयराम सरडे, मोहन पवार, गणेश चौधरी, संतोष येवले, यशराज राहाणे, अक्षय जाधव, रोहित मोरे, सुरज शिरसाठ, जगन मगर, शांताराम पाडळे, शुमम पाडळे, दत्ता टोणगे आदि सहकारी उपस्थित होते.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद