सुर्यमुखी श्री दत्त देवस्थान महाआरती सोहळा उत्सवात साजरा

0



महाराष्ट्र दर्शन न्युज / शिरूर

शिरूर तालुक्यातील मोटेवाडी येथिल जागृत सूर्यमुखी श्री.दत्त देवस्थान येथे पार्वती फौंडेशनच्यावतीने वटपौणिमेला महाआरती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे निवृत्त डेप्युटी इंजिनिअर भाऊसाहेब साबळे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. 



भाऊसाहेब साबळे यांनी श्री. दत्त देवस्थान बद्दलचे महत्व सांगून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व पालकांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केले पालक व विद्यार्थी यांनी संकल्प करूनच स्पर्धा परिक्षेला सामोरे जाऊन चांगल्या पद्धतीने उत्तीर्ण व्हावे असे सांगितले. पार्वती फाउंडेशन पुणे व जागृत सूर्यमुखी श्री. दत्त देवस्थान यांच्या वतीने नऊ कोटी लोकांना अन्नदान, स्पर्धा परीक्षेसाठी लागणारे मार्गदर्शन व अभ्यासिका, जनसमुदाय विकास व गरिबांसाठी औषधउपचार असे विविध सामाजिक उपक्रम राबविले जाणार असल्यामुळे उद्योजक व देवस्थान  ट्रस्टचे अध्यक्ष बाबासाहेब जासूद यांचे अभिनंदन केले व कार्यास शुभेच्छा दिल्या  

यावेळी मोटेवाडी गावचे सरपंच नानासाहेब गवळी, उपसरपंच जीवन जासुद, माजी सरपंच संदिप येलभर, ह.भ.प गणेश महाराज कोल्हे, राजेंद्र काळे, मनोहर काळे, सरस्वती संकपाळ, शंकर येलभर, दशरथ कोल्हे, निलेश शिंदे, लहू शिंदे, संतोष चोरमले, रोहिदास बढे यांच्यासह भाविक, मोटेवाडी येथील प्रगत शेतकरी वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पत्रकार अर्जुन बढे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top