महाराष्ट्र दर्शन न्यूज / पारनेर प्रतिनिधी- सागर आतकर
पारनेर तालुक्यातील निघोज येथील श्री. मुलिकादेवी महाविद्यालयात हिंदी विभागाच्या वतीने हिंदी दिवस साजरा करण्यात आला. देशभरात हिंदी भाषा दिन साजरा केला जात आहे. यामागे हिंदी भाषा जपणे, वाढवणे, जागृती निर्माण करणे हा उद्देश आहे. दरम्यान, हिंदी भाषा ही जगातील सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक आहे.असे मत डॉ. सहदेव आहेर यांनी व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सहदेव आहेर,उपप्राचार्य डॉ मनोहर एरंडे,प्रमुख पाहुणे अळकुटी महाविद्यालयातील प्राध्यापक शेळके दत्तात्रय महाविद्यालयातील हिंदी विभागप्रमुख प्रा. मनीषा गाडिलकर महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
हिंदी भाषेला महत्त्व आहे. हिंदी दिवस साजरा करण्याचा मुख्य हेतू हिंदी वाचवण्याचा प्रयत्न आहे. आज आपण इंग्रजी भाषेला अधिक महत्त्व देतो पण त्याच बरोबर साधारणपणे हिंदी बोलणे हे सुद्धा महत्त्वाचे मानले जाते.- डॉ. सहदेव आहेर
यावेळी प्रमुख पाहुणे प्रा. शेळके दत्तात्रय यांनी सांगितले की १४ सप्टेंबर १९४९ रोजी घटना समितीने भारतीय संघराज्याच्या राजभाषेत ऐतिहासिक निर्णय घेऊन हिंदी भाषेला राजभाषेचा सन्मान दिला. त्यामुळे दरवर्षी हिंदी दिवस साजरा केला जातो असे सांगीतले.
डॉ.मनोहर एरंडे यांनी भारतामध्ये हिंदी भाषेतलं सौंदर्य, त्यामधील साहित्य जगासमोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. भारत हा विविधतेमध्ये एकता जपणारा देश आहे. या देशात जशी संस्कृती बदलते तशी भाषादेखील बदलते मात्र उत्तर भारतासह बहुसंख्य राज्यांमध्ये हिंदी भाषा बोलाली जाते. हिंदी दिवसाचं औचित्य साधून देशभरात सरकारी कार्यालयामध्ये खास कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. याद्वारा हिंदी या भारताच्या राजभाषेचा प्रसार केला जातो. जगात सर्वाधिक बोलल्या जाणार्या भाषांमध्ये टॉप पाच भाषांमध्ये हिंदीचाही समावेश आहे असे सांगितले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक हिंदी विभागप्रमुख प्रा. मनीषा गाडिलकर,सूत्रसंचालन प्रा. विशाल रोकडे तर आभार प्रा. पोपटराव सुंबरे यांनी मांडले.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद