![]() |
सायंकाळी ७ ते ८ संतोष महाराज गाडेकर (साकूर) यांचे प्रवचन (फोटो- दत्ताजी लंके) |
महाराष्ट्र दर्शन न्यूज / पारनेर प्रतिनिधी- सागर आतकर
पारनेर तालुक्यातील निघोज येथील खंडोबा देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून खंडोबा मंदिरामध्ये शिवलिंग तसेच महादेवाचे वाहन नदीची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आली. यानिमित्ताने धर्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी ९ ते १0 या वेळेत शिवलिंग तसेच महादेवाचे वाहन नदीची हरिनामाच्या घोषात मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर १0.३0 ते १ यावेळेत प्राणप्रतिष्ठापना व अभिषेक करण्यात आला. सायंकाळी ७ ते ८ संतोष महाराज गाडेकर (साकूर) यांचे प्रवचन, रात्री ८ ते ९ महाप्रसाद, रात्री १0 ते ११ श्रीराम भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रम प्रसंगी भाविक भक्त, लंके भावकी तसेच ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद