पारनेर तालुक्यातील निघोज येथील श्री. मुलिकादेवी महाविद्यालयात हर्बल गार्डन प्रकल्पासाठी आयुष मंत्रालय नवी दिल्ली यांच्याकडून अनुदान प्राप्त झाले असून त्याचे भूमिपूजन अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे अध्यक्ष मा. आ. नंदकुमार झावरे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी संस्थेचे जेष्ठ विश्वस्त मा. सीताराम खिलारी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सहदेव आहेर तसेच सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र शासन व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या कडून मंजुरी मिळालेल्या बी.एस्सी. संगणक शास्त्र या नूतन शाखेचे उद्घाटन पार पडले.
महाविद्यालयातील तरुणांनी भविष्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करत असताना आपल्या ज्ञानाचा उपयोग करून विकास करावा, औषधी वनस्पतींच्या शेतीतून आर्थिक तसेच व्यावसायिक उत्पादन घेणे शक्य आहे असे सांगितले. तसेच महाविद्यालयाचा विकास खूप वेगाने होत आहे पुणे विद्यापीठातील एक उपक्रमशील महाविद्यालय म्हणून अल्पकाळात या महाविद्यालयाने आपली ओळख निर्माण केली आहे तसेच बीएस्सी संगणकशास्त्र या शाखेमध्ये देखील अशीच प्रगती सुरू राहील असे प्रतिपादन झावरे यांनी केले.
तर सीताराम खिलारी यांनी महाविद्यालयाच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रम प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सहदेव आहेर यांनी महाविद्यालयाची वाटचाल कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून अधोरेखित केली. या कार्यक्रमासाठी प्रा. नूतन गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. आनंद पाटेकर यांनी आभार मानले.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद