महाराष्ट्र दर्शन न्यूज / पारनेर प्रतिनिधी- सागर आतकर
पारनेर तालुक्यातील श्री क्षेत्र पिंपळनेर येथे नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री. संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळा संपन्न झाला. यावेळी समस्त नाभिक बांधव कार्यक्रमासाठी उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात श्री. संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी ह. भ. प सोमनाथ महाराज राऊत यांचे सुंदर असे प्रवचन पार पडले. यानंतर आरती आणि उपस्थित बांधवांच्या वतीने पुष्पाजली व समाजातील कैलासवाशी बांधवाना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच पारनेर तालुका नाभिक संघटनेच्या वतीने समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा व जेष्ठ समाज सेवकांना आणि आरोग्य सेवेतल्या आशा वर्कर व सुपरवाईझर यांना त्यांच्या केलेल्या कामांचा गौरव म्हणून सन्मान चिन्ह देऊन सर्वाना गौरवण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष बबनराव आतकर यांनी भुषवले याची सूचना पारनेर तालुका नाभिक संघटना उपाध्यक्ष श्री शाम साळुंके यांनी मांडली त्यास बारा बलुतेदार तालुका अध्यक्ष मनोहर राऊत यांनी सर्वांच्या वतीने अनुमोदन दिले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे लोकनेते आमदार निलेशजी लंके यांचे पिताश्री ज्ञानदेव लंके व मा.जिल्हा परिषद सदस्य आझादभाऊ ठुबे, अहमदनगर नाभिक महामंडळ चे जिल्हा उपाध्यक्ष श्री शामकांत जाधव, पारनेर तालुका नाभिक संघटना अध्यक्ष श्री. दादाभाऊ बिडे, कार्याध्यक्ष श्री नवनाथ राऊत, प्रमोद सोनवणे, सोनू बिडे, पा. ता. नाभिक युवक संघटना अध्यक्ष श्री प्रसाद भोसले, पा ता. नाभिक संघटना सचिव विनायक कुटे, सहसचिव श्री. सुनील आतकर, माऊली कोरडे, संजय कार्ले, रमेश कार्ले, श्री संजय वाघचौरे, राम साळुंके, सिद्धांत जाधव, नवनाथ जाधव, रवी जाधव, भाऊ सोनवणे, नवनाथ कुटे, गणेश जाधव, संदीप वाघमारे, राजू पंडित, रघुनाथ कार्ले, सोनवणे, दत्ता सोनवणे, धनंजय सोनवणे, शिवाजी जाधव, नाना राऊत, सुखदेव राऊत, बाळासाहेब चव्हाण, जनसेवा पक्षाचे तालुका अध्यक्ष मुरली आतकर, राजेंद्र पंडित, अशोक पंडित आदी मान्यवर उपस्थित होते. दत्तोबा भोसले यांनी उपस्थित मान्यवरांचे व समाजाचे आभार व्यक्त केले.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद