महाराष्ट्र दर्शन न्यूज / पारनेर प्रतिनिधी- सागर आतकर
भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य विश्वनाथ कोरडे यांनी त्यांच्या ५४ व्या वाढदिवसानिमित्ताने सामाजिक उपक्रम राबवत आपल्या केक न कापता केक ऐवजी गुळाची ढेप कापून वाढदिवस साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच निमित्ताने त्यांनी परिसरामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवले असून त्यामध्ये वृक्षारोपण, रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी शिबीर तसेच विशेष करून हायस्कूलमध्ये शिकणाऱ्या आणि आयुष्याच्या महत्त्वाच्या वळणावर असलेल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरतील अशा स्वरूपाची पुस्तकेही शाळांना भेट म्हणून देण्यात आली आहेत. त्यामध्ये भारताचे माजी राष्ट्रपती डॉ एपीजे अब्दुल कलाम, इन्फोसिसच्या सुधा मूर्ती, पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील इत्यादी लेखकांच्या सहाशे पुस्तकांचा समावेश आहे.
वाढदिवसाचा कार्यक्रम हा राळेगण थेरपाळ येथील सिद्धी लॉन्स येथे संपन्न होणार असून त्यादिवशी सुप्रसिद्ध पार्श्वगायक श्री. ज्ञानेश्वर मेश्राम, पार्श्वगायिका ज्योती गोराणे व कल्याणी देशपांडे यांच्यासह भजनांजली हा कार्यक्रम आणि स्नेहभोजन अशा पद्धतीने साजरा होणार आहे.
वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांना आणि मित्रांना विनंती आहे. कार्यक्रम स्थळी केक कापला जाणार नाही किंवा वाढदिवस केक कापून साजरा होणार नाही. कार्यक्रम स्थळी महाराष्ट्रीयन संस्कृतीला साजेशा अशा पद्धतीने सेंद्रिय गुळाची ढेप कापून गुळ वाटप करून (शेरनी वाटप) आणि औक्षण करून वाढदिवस साजरा होईल. यामागचा उद्देश असा की महाराष्ट्रीयन संस्कृतीची जोपासना व्हावी आणि केक ऐवजी शेतकऱ्यांना फायदा व्हावा. कार्यकर्त्यांनी कुठल्याही भेटवस्तू आणू नये. अगदीच इच्छा असल्यास विद्यार्थ्यांना शालोपयोगी ठरतील अशा स्वरूपाच्या भेटवस्तू आणाव्यात- विश्वनाथ कोरडे ( भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य, महाराष्ट्र राज्य )
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद