शिक्षक दिन म्हणजे गुरूंचा सन्मान सोहळाच होय- डॉ. ईश्वर पवार

0



महाराष्ट्र दर्शन न्युज / निघोज / प्रतिनिधी: सागर आतकर

अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे निघोज येथील श्री. मुलिकादेवी महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे अखिल भारतीय चित्रपट महासंघाचे आजीव सदस्य डॉ. ईश्वर पवार बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सहदेव आहेर होते.

आज ०५ सप्टेंबर म्हणजे डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस, हा दिवस संपूर्ण भारतभर साजरा केला जातो. यादिवसाचे औचित्य साधून महाविद्यालयातील शिक्षक विद्यार्थी यांनी हा दिवस आनंदात साजरा केला. यावेळी विद्यार्थी प्राचार्य श्रुती लामखडे तर उपप्राचार्य उत्तम वाजे व विद्यार्थी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरवात मान्यवरांनी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची प्रतिमा पूजन करून केले. डॉ. ईश्वर पवार म्हणाले की गुरूंचे स्थान जिवणात महत्वाचे असते. शिक्षक हा समाजाकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता निस्वार्थ भावनेने अध्यापन व ज्ञानदानाचे कार्य करत असतो. विद्यार्थी व समाज घडवण्यात शिक्षक महत्त्वाची भूमिका निभावतात. सर्वांना नवी दिशा दाखवून जिद्दीने उभे राहण्यास शिक्षक मदत करतात असे सांगीतले.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सहदेव आहेर म्हणाले की, शिक्षकांचे महत्व प्रत्येकाच्या जीवनात असते. चांगला समाज घडविण्याचे काम शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षक करत असतो. मुलिकादेवी महाविद्यालयाने अनेक विद्यार्थी घडवले असून त्यांना दिशा दिली आहे तसेच आजच्या जगात संगणक अभियांत्रिकी बरोबरच सामाजिक अभियांत्रिकी अधिक तळागाळापर्यन्त विकसित करणे गरजेचे आहे असे सर्व सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या विचारात असल्याचे मत प्राचार्य डॉ. सहदेव आहेर यांनी व्यक्त केले व शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी शिक्षक मनोगत प्रा.अशोक कवडे व प्रा. नूतन गायकवाड यांनी केले तर विद्यार्थी शिक्षक मनोगत संकेत कारखिले, निचीत नवनाथ या विद्यार्थी शिक्षकांनी केले.

कार्यक्रमाचे नियोजन मराठी विभागप्रमुख व सांस्कृतिक समन्वयक प्रा. प्रविण जाधव यांनी केले. यावेळी उपप्राचार्य डॉ. मनोहर एरंडे, महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुणे परिचय पायल पांढरकर यांनी केले. सूत्रसंचालन शर्वरी लामखडे व श्वेता शिंदे यांनी केले तर आभार वैभव साळवे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top