महाराष्ट्र दर्शन न्युज / पारनेर- प्रतिनिधी : सागर आतकर
ग्रामीण भागातील मुलींना वैद्यकीय शिक्षणाची सहज उपलब्धता मिळावी या उद्देशाने सावली प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेने सावली परिचारिका विद्यालयाची स्थापना करून समाजातील गरजु विद्यार्थ्यांसाठी कमी खर्चात
शिक्षण उपलब्ध केल्याने मुली स्वावलंबी बनत आहे शैक्षणिक क्षेत्रातील सेवाभाव सावली प्रतिष्ठान ने जपला असल्याचे प्रतिपादन जेष्ठ नेते सिताराम खिलारी यांनी केले.
टाकळी ढोकेश्वर (ता.पारनेर) येथील सावली प्रतिष्ठान संचलित सावली परिचारिका विद्यालयात शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी डॉ.भाऊसाहेब खिलारी, डॉ.स्वाती खिलारी, नितीन आंधळे, भाऊसाहेब हिंगडे, प्राचार्य सुशांत शिंदे, नामदेव वाळुंज उपस्थित होते.
खिलारी म्हणाले, शिक्षक हा केवळ शिक्षक न राहता तो समाजशिक्षक बनला पाहजे. आणि आज होणाऱ्या विकृत घटनांना थांबवण्यासाठी समाजाचा समुपदेशक बनला पाहिजे.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी योगिता टकले, आर.ए.एन.एम प्रथम व द्वितीय वर्ष विद्यार्थिनींनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कावेरी घोलप, आरती औटी यांनी केले आभार कुऱ्हाडे रजनी हिने मानले.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद