अन्यथा आगारातच ठिय्या आंदोलन करू; शिवबा विदयार्थी संघटना आक्रमक

0

 


महाराष्ट्र दर्शन न्युज/ निघोज / प्रतिनिधी- सागर आतकर

पारनेर तालुक्यातील कान्हूर पठार व वडनेर बु. या गावामध्ये रात्रीची मुक्कामी बससेवा अनेक वर्षापासून सुरु होत्या. कान्हूर पठार व वडनेर बु. सह निघोज, पिंप्री जलसेन, चिंचोली या गावातून अनेक विदयार्थी- विदयार्थीनी पारनेर येथे महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी येत असतात. मात्र कोरोना काळात ज्या बससेवा बंद केल्या त्या अजून सुरु झाल्या नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांसह सह नागरीकांचे अतोनात हाल होत आहे व शैक्षणिक नुकसान होत आहे. याबाबत शिवबा विदयार्थी संघटना आक्रमक झाली आहे. 

त्वरित बससेवा सुरु करावी अन्यथा आगारातच ठिय्या आंदोलन शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे यांच्या नेतृत्वाखाली करणार असल्याचे शिवबा विदयार्थी संघटनेचे उपतालुका प्रमुख यश राहाणे यांनी सांगितले.

यासंदर्भातील संघटनेच्या वतीने निवेदन पारनेर आगारप्रमुख मा. भोपळे साहेब यांना देण्यात आले.यावेळी शिवबा संघटनेचे पदाधिकारी मा.यश राहाणे, विकास मोरे, निलेश दरेकर, अमोल ठुबे, शुभम पाडळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top