महाराष्ट्र दर्शन न्यूज / निघोज प्रतिनिधी- सागर आतकर
स्वतंत्र भारताचे अमृत महोत्सवी वर्ष १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या दरम्यान साजरे होत आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून संपूर्ण भारतभर विविध उपक्रम राबवले जात असून केंद्र सरकार हर घर तिरंगा ही मोहीम राबवत असून हे अभियान यशस्वी करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या घरावर आपला तिरंगा झेंडा फडकवून राष्ट्रीय एकात्मता जपली पाहिजे असे मत निघोज ग्रामपंचायतच्या कार्यक्षम व कार्यकुशल सदस्या सौ. सुधामती विठ्ठल कवाद यांनी व्यक्त केले.
पारनेर तालुक्यातील निघोज ग्रामपंचायतच्या कार्यक्षम व कार्यकुशल सदस्या सौ. सुधामती विठ्ठल कवाद यांनी घरोघरी जावुन वार्ड क्र.६ मध्ये तिरंगा हे अभियान यशस्वीपणे राबविले. नागरिकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. घरोघरी जाऊन देशभक्ती जागृत करण्यासाठी स्वातंत्र्य चळवळीतील इतिहास प्रसंग, घटना, यांच्या माध्यमातून जनजागृती केली. यावेळी ग्रा.प.सदस्य दिगंबर लाळगे यांचीही मदत झाली.
भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव राबविण्यात येत आहे. 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना प्रमाणे" घरोघरी तिरंगा" हा उपक्रम राबविण्यात येत आहे. घरोघरी तिरंगा हा उपक्रम सर्वं नागरिकांच्या आणि महिला भगिनींच्या सहकार्याने यशस्वी होणार आहे असे असा विश्वास ग्रामपंचायत सदस्या सुधामती कवाद यांनी व्यक्त केला.
भारत स्वतंत्र होण्यासाठी अनेक महापुरुषांनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले खऱ्या अर्थाने अमृत महोत्सवी वर्ष साजरी करत असताना त्यांच्या या शौर्याचे आपण स्मरण केले पाहिजे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत असताना देशात मोठ्या प्रमाणात विकासात्मक काम होणे गरजेचे आहे.-सौ. सुधामती विठ्ठल कवाद (निघोज ग्रा.प.सदस्या)
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद