शिरूर विधानसभा मतदारसंघातील भाजपचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे निधन

0



महाराष्ट्र दर्शन न्यूज / शिरूर प्रतिनिधी

शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे दीर्घ आजाराने निधन झालं आहे. ते ७१ वर्षांचे होते. गेल्या दोन वर्षांपासून ते गंभीर आजाराने ग्रस्त होते. मात्र काही दिवसांपासून त्यांचा आजार बळावला आणि प्रकृती ढासळली. त्यातच आज दुपारच्या सुमारास बाबुराव पाचर्णे यांची शिरूर येथे प्राणज्योत मालवली आहे.

भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी बाबुराव पाचर्णे यांची शिरुर येथे रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. शिरूर तालुक्यातील भाजपचा मोठा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. २०१४ विधानसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीचे नेते अशोक पवार यांना हरवून विजय मिळवला होता. त्यांच्या जाण्याने मतदारसंघात भाजपचा मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, बाबुराव पाचर्णे यांनी २००४ ते २००९ आणि २०१४ ते २०१९ या कालावधीत शिरूर विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व केले होते.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top