शिक्षक नेते बा. ठ. झावरे यांचा समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश

0

पारनेर तालुक्याच्या उत्तर भागात राष्ट्रवादीला बळकटी

महाराष्ट्र दर्शन न्यूज / पारनेर/प्रतिनिधी : 

राजकीय दृष्ट्या तालुक्यात महत्त्वपूर्ण असलेल्या वासुंदे येथील ग्रामीण अर्थकारणाला गती देणाऱ्या गुरुदत्त मल्टीस्टेट पतसंस्थेचे चेअरमन व शिक्षक नेते बा. ठ. झावरे यांनी सुपा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आपल्या समर्थकांसह जाहीर प्रवेश केला. 

बा. ठ. झावरे हे शिक्षक नेते असून शिक्षकांच्या अनेक प्रश्नांवर व समस्यांवर त्यांनी आजपर्यंत काम केले आहे. गुरुदत्त मल्टीस्टेट पतसंस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अर्थकारणाला त्यांनी गती दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्थापनेपासून पक्षाच्या सोबत ते जोडले गेले होते परंतु मध्यंतरी काही राजकीय स्थित्यंतरांना मुळे ते पक्ष संघटनेपासून दुरावले होते. पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांच्या कार्याने प्रभावित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये पुन्हा प्रवेश केला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील त्यांचा प्रवेश राजकीय जाणकारांना भुवया उंचवायाला लावणारा आहे. बा. ठ. झावरे हे एक शांत संयमी हुशार सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन जाणारे अडचणीत मदत करणारे एक अनुभवी नेतृत्व आहे. सहकार क्षेत्राच्या माध्यमातून ग्रामीण भागाला आर्थिक गती त्यांनी दिली आहे. गुरुदत्त मल्टीस्टेट पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक बेरोजगार युवकांना, व्यावसायिकांना, शेतकऱ्यांना त्यांनी मदत केली आहे. त्यामुळे त्यांच्या रूपाने पारनेर तालुक्याच्या उत्तर भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला एक चांगला चेहरा मिळाला आहे. 

बा. ठ. झावरे यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत सुपा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे घड्याळ हातात बांधले यावेळी त्यांच्या समवेत वासुंदे येथील मा. उपसरपंच महादू भालेकर, ज्येष्ठ नेते भागूजी झावरे, भिमाजी गायखे, गजानन झावरे, वासुंदे सेवा सोसायटीचे व्हा. चेअरमन रा. बा.  झावरे, रावसाहेब बर्वे, निवृत्ती झावरे, सुदाम शिर्के, मनोहर झावरे, युवा नेते स्वप्निल झावरे, गीताराम जगदाळे, आदी सहकारी यावेळी उपस्थित होते.

गेल्या दोन पिढ्यांपासून ज्यांना आम्ही मदत केली त्यांच्याकडून अपमान व कायमच उपेक्षा होत असल्याने आ. लंके यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला असल्याचे बा. ठ. झावरे यांनी सांगितले. तर स्व. वसंतराव झावरे यांच्या विचारांना पुढे नेण्यासाठी राष्ट्रवादीत प्रवेश केला असल्याचे माजी उपसरपंच महादु भालेकर म्हणाले. खा. सुळे यांनी प्रवेश केलेल्यांचा सत्कार करत भविष्यात पक्षात संधी दिली जाईल, असे आश्वासन दिले.

झावरे व समर्थकांच्या प्रवेशावेळी खासदार सुप्रिया सुळे महिला आयोगाचे अध्यक्षा रूपाली चाकणकर, आमदार निलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पारनेर तालुका अध्यक्ष बाबाजी तरटे, अहमदनगर राष्ट्रवादी युवती काँग्रेस पार्टीच्या जिल्हाध्यक्षा राजेश्वरी कोठावळे, युवक अध्यक्ष विक्रम कळमकर महिला अध्यक्षा सुवर्णा घाडगे, पूनम मुंगसे, 

पारनेरच्या उपनगराध्यक्षा सुरेखा भालेकर, सुदाम पवार, अॅड. राहुल झावरे, दादा शिंदे, बापूसाहेब शिर्के, अर्जुन भालेकर, संतोष वारे, राणीताई लंके, बाळासाहेब कावरे, अशोक घुले, कारभारी पोटघन, जितेश सरडे, सचिन पठारे, राजेंद्र शिंदे, बाळासाहेब दळवी, जगदीप साठे, चंद्रकांत मोढवे, सचिन पवार, योगेश मते, बाळासाहेब लंके, सचिन औटी, विजय औटी, भूषण शेलार, बाळासाहेब नगरे, श्रीकांत चौरे आदी यावेळी उपस्थित होते.




बा. ठ. झावरे यांच्यासारख्या माणसांची पक्षाला गरज...

तालुक्यातील वासुंदे येथील गुरूदत्त पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन व प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी अध्यक्ष बा. ठ. झावरे यांच्यासारख्या मनमोकळ्या माणसांची पक्षाला व मला गरज आहे. त्यामुळे तुम्ही माझ्या खांद्यावर डोके टेकविले असून आता चिंता सोडा. आम्ही लोकांसारखे गळे आवळणारे नसुन जीवाला जीव देणारे व जीव लावणारी माणसे आहोत. वासुंदे गावाप्रती व माणसांप्रती वेगळी आस्था असुन त्यांच्या अनुभवाचा व कार्याचा मला फायदा होईल असे, आमदार नीलेश लंके म्हणाले. तर वासुंदे गावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे आश्वासन आ. लंके यांनी दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top