महाराष्ट्र दर्शन न्यूज / पारनेर प्रतिनिधी :
शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. पारनेर तालुक्यातील वासुंदे येथे आदिमाया शक्ती जोगेश्वरी देवीचा नवरात्र उत्सव असतो नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात यंदा मोठा उत्साह असणार आहे. कारण कोरोनामुळं गेले दोन वर्ष निर्बंध असलेला हा उत्सव यंदा निर्बंधमुक्त स्वरुपात होतोय. नवरात्रीच्या उत्सवात देवींच्या मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते भक्तीमय वातावरणामध्ये दरवर्षी या ठिकाणी किर्तन भजन प्रवचन असे धार्मिक कार्यक्रम असतात. वासुंदे येथील आदिमाया शक्ती जोगेश्वरी ही एक जागृत देवता आहे. वासुंदे पंचक्रोशीतून मोठ्या प्रमाणात भक्त या ठिकाणी दर्शनासाठी व कार्यक्रमासाठी उपस्थित असतात. नवरात्र उत्सव सुरू झाला आहे सलग नऊ दिवस या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम होत आहेत.
यादरम्यान ह. भ. प. धनंजय महाराज उदावंत ह. भ. प. संदीप महाराज गोडसे ह. भ. प. अक्षय महाराज उगले ह. भ. प. रामेश्वर महाराज भोजने ह. भ. प. काशिनाथ दास पाटील महाराज ह भ प गजानन महाराज चंद ह. भ. प. नवनाथ महाराज निकम ह. भ. प. डॉ. नारायण महाराज जाधव यांची कीर्तन सेवा होणार आहे तर सोमवार दि. ३ ऑक्टोंबर रोजी संत पंढरी कीर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच बुधवार दि. ५ ऑक्टोंबर रोजी ह. भ. प. भागवताचार्य रमेश महाराज कुलकर्णी यांचे काल्याचे किर्तन होणार आहे.
या उत्सवा दरम्यान दररोज रात्री ९ ते १२ हरी जागर, पहाटे ३ ते ६ काकडा सकाळी ७: ३० वाजता सामूहिक आरती ७ : ३० ते १२: ३० पर्यंत ज्ञानेश्वरी पारायण व संध्याकाळी पुन्हा हरिपाठ आणि आरती होत असते तसेच सकाळी व संध्याकाळी दर्शनासाठी व धार्मिक कार्यक्रमांसाठी येणाऱ्या भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. अशा प्रकारच्या विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. जोगेश्वरी देवस्थान दरवर्षी अशा प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करते. आशी माहिती जोगेश्वरी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन जालिंदर वाबळे यांनी दिली आहे. यावेळी वाबळे म्हणाले की आदिमाया शक्ती जोगेश्वरी देवस्थान हे श्रद्धेचे देवस्थान आहे मोठ्या प्रमाणात भाविक भक्त या ठिकाणी येतात वासुंदे पंचक्रोशी तसेच टाकळी ढोकेश्वर, कर्जुले हर्या, सावरगाव, खडकवाडी, पळशी, वनकुटे, वडगाव सावताळ, मांडवे, देसवडे, पोखरी, कामटवाडी, वारणवाडी, तिखोल, कान्हूर पठार या भागातून मोठ्या प्रमाणात भाविक भक्त जोगेश्वरी देवीच्या दर्शनासाठी येत असतात आदिमाया शक्ती जोगेश्वरी देवस्थानच्या माध्यमातून विविध धार्मिक सामाजिक कार्यक्रमांचे गेल्या १४ वर्षापासून दरवर्षी आयोजन केले जाते. यापुढील काळात जोगेश्वरी देवस्थानला शासकीय पातळीवर प्रयत्न करून 'क' वर्ग दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. देवस्थान विकासासाठी वासुंदे येथील वाबळे वस्ती, उगले वस्ती, दाते वस्ती, हिंगडे वस्ती, येथील ग्रामस्थ व भाविक भक्तांचे देवस्थान साठी नेहमीच मोलाचे योगदान राहिले आहे व ते देवस्थानच्या विकासासाठी नेहमीच सहकार्य करत आहेत. वासुंदे परिसरातील ग्रामस्थ हे नवरात्र उत्सवामध्ये जोगेश्वरी मंदिरामध्ये येऊन भक्तिमय वातावरणामध्ये देवीची सेवा करतात.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद