मांडओहळ येथील हल्ल्याची सखोल चौकशी करा : प्रकाश गाजरे

0

महाराष्ट्र दर्शन / पारनेर प्रतिनिधी :

मांडओहळ परिसरात दोन दिवसांपूर्वी म्हसोबा झाप येथील शासकीय कंत्राटदार असलेल्या स्वप्निल आग्रे याच्यावर गोळीबार करत भ्याड हल्ला करण्यात आला. त्यामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या हल्ल्यामध्ये स्वप्निल आग्रे हा जखमी झाला असून त्याच्यावर अहमदनगर येथे उपचार सुरू आहेत. या हल्ल्याचा तीव्र निषेध करत या हल्ल्यातील मुख्य सूत्रधार लवकर शोधून अटक करावी असा खुनी हल्ला करणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे अशी मागणी म्हसोबा झापचे सरपंच प्रकाश गाजरे यांनी हल्ल्याप्रकरणी पोलीस प्रशासनाला निवेदन देत केली आहे.

म्हसोबाचा ग्रामस्थांच्या वतीने सरपंच प्रकाश गाजरे यांनी स्वप्नील आग्रे यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे व हल्ल्यातील आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे.

सरपंच प्रकाश गाजरे म्हणाले की मांडओहळ परिसरामध्ये अशा प्रकारचा खुनी हल्ला करण्याचा जो प्रयत्न झाला त्या आरोपींना अटक करून फाशी देण्यात यावी अशा प्रकारचा खुनी हल्ला झाल्यामुळे परिसरामध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.


पोलीस प्रशासनाला निवेदन दिले यावेळी सरपंच प्रकाश गाजरे यांच्या समवेत लहू वाळुंज, पांडुरंग आहेर, पांडुरंग भालके, उत्तम गुंजाळ, बन्सी आरोटे, झांबर दरेकर, अनिल आहेर, अशोक आहेर, सावकार रोहकले, बाळासाहेब वाळुंज, गोरख शिंदे, शांताराम शिंदे, गणेश वाकळे, संदीप गुंजाळ, शांताराम बेलकर, माऊली बेलकर, संपत वाळुंज, भाऊ हांडे, भाऊसाहेब हांडे, संतोष हांडे, अविनाश हांडे, संदेश शिंदे, निलेश दरेकर, कैलास आगळे, हरि रोहकले, सुभाष दरेकर, संतोष दरेकर, बाबाजी आरोटे, गणेश दरेकर, गणेश वाळुंज, अरुण बेलकर, संजय बेलकर, पांडुरंग जाधव, प्रशांत गिरी, नितीन गाढवे, किसन दरेकर, अजित आहेर, अजित सहाणे, विठ्ठल आहेर, सखाराम शिंदे, धोंदिभाऊ शिंदे, वैभव गुंजाळ, दीपक आरोटे, बाळासाहेब आग्रे, गोविंद आग्रे, सुखदेव आहेर, चंद्रकांत शिंदे, किसन गाढवे, विशाल आहेर, प्रशांत आहेर, प्रशांत गुंजाळ, मारुती आरोटे, रामदास दरेकर, अविनाश आहेर, रविकिरण गाजरे, अक्षय आहेर व म्हसोबाझाप येथील ग्रामस्थ उपस्थित होते.


पोखरीचे सतीश पवार यांनीही केला निषेध व्यक्त..

पोखरी येथील सामाजिक कार्यकर्ते मा. ग्रामपंचायत सदस्य सतीश पवार यांनी मांडओहळ परिसरामध्ये स्वप्निल आग्रे या युवकावर केलेल्या खुनी हल्ल्याचा आपल्या ग्रामपंचायतीच्या वतीने निषेध केला आहे व ही घडलेली घटना अतिशय चुकीची असून संबंधित हल्लेखोरांना कडक शिक्षा मिळाली पाहिजे. या हल्ल्या मागील मुख्य सूत्रधार कोण याचाही तपास होणे आता गरजेचे आहे. या प्रकरणांमध्ये पोलीस प्रशासनाने दाखवलेल्या तत्परतेचेही सतीश पवार यांनी कौतुक केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top