महाराष्ट्र दर्शन न्यूज / पारनेर प्रतिनिधी :
शिंदे-फडणवीस सरकार मंत्रिमंडळात कॅबिनेट दर्जाचे महसूल मंत्री म्हणून स्थान मिळालेले अहमदनगर जिल्ह्याचे भूषण नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची मुंबई या ठिकाणी सह्याद्री अतिथी गृहावर पारनेर तालुक्यातील ज्येष्ठ नेते अहमदनगर जिल्हा मराठा शिक्षण संस्थेचे विश्वस्त सिताराम खिलारी यांनी भेट घेतली. यावेळी त्यांच्या समवेत युवा नेते जिल्हा परिषद मा. सदस्य राहुल शिंदे पाटील हे उपस्थित होते.
यावेळी तालुक्यातील अनेक विकासात्मक प्रश्नांवर त्यांनी मंत्री नामदार राधाकृष्ण विखे यांच्यासोबत चर्चा केली. व लवकरच आपण पारनेर तालुक्याचा दौरा करावा असे सांगितले. व तालुक्यामध्ये येण्याचे निमंत्रण दिले.
ज्येष्ठ नेते सिताराम खिलारी सर हे खासदार पद्मभूषण स्वर्गीय बाळासाहेब विखे यांचे पारनेर तालुक्यातील अतिशय जवळचे निकटवर्तीय विश्वासू समजले जायचे. विखे कुटुंबाने नेहमीच खिलारी यांच्या माध्यमातून पारनेर तालुक्याच्या व टाकळी ढोकेश्वर परिसराच्या विकासासाठी झुकते माप दिले आहे.
नामदार विखे मंत्री झाल्यानंतर ज्येष्ठ नेते सिताराम खिलारी यांनी त्यांची प्रथमच भेट घेतली यावेळी त्यांनी विखे यांचा सन्मान व सत्कार केला.
ज्येष्ठ नेते सिताराम खिलारी व युवा नेते राहुल पाटील शिंदे हे मंत्री नामदार विखे यांना भेटल्यानंतर पारनेर तालुक्याचा आपण दौरा करावा व तालुक्यातील समस्या व प्रश्न समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत. अशी भूमिका मांडली.
यावेळी पत्रकारांशी बोलताना युवा नेते राहुल पाटील शिंदे म्हणाले की नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची आम्ही कौटुंबिक भेट घेतली आहे. विखे कुटुंबाचे आणि आमचे जुने सबंध आहेत विखे कुटुंबाने नेहमीच आपल्या तालुक्याच्या विकासासाठी विचार केला असून तालुक्यात भरीव निधी दिला आहे.
दरम्यान जुन्या पिढीतील ज्येष्ठ नेते सिताराम खिलारी व नव्या पिढीतील युवा नेते राहुल पाटील शिंदे हे नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना मुंबई या ठिकाणी भेटल्यामुळे तालुक्यामध्ये अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद