टाकळी ढोकेश्वर येथे स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळा डॉ. भाऊसाहेब खिलारी यांची माहिती

0



महाराष्ट्र दर्शन न्यूज / पारनेर प्रतिनिधी :

तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सावली प्रतिष्ठान तसेच श्री ढोकेश्वर विद्यालय व महाविद्यालय आयोजित अपेक्स करिअर अकॅडमी मार्फत एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन कटारिया मंगल कार्यालय येथे करण्यात आले आहे. अशी माहिती सावली प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. भाऊसाहेब खिलारी यांनी दिली. या करिअर अकॅडमी मार्फत विद्यार्थ्यांना आर्मी, नेव्ही, पोलीस भरती , MPSC, UPSC, तसेच विवीध स्पर्धा परीक्षेची तयारी अभ्यासाची दिशा व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या सेमिनारमध्ये नववी, दहावी, पासून पुढच्या सर्व विद्यार्थ्यांनी आपला जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शक म्हणून सावली प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ भाऊसाहेब खिलारी, श्री ढोकेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मतकर सर, श्री ढोकेश्वर विद्यालयाचे प्राचार्य जावळे सर हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्वांनी आपला सहभाग नोंदवावा. असे आवाहन करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top