महाराष्ट्र दर्शन न्यूज / निघोज प्रतिनिधी- सागर आतकर
पारनेर तालुक्यातील निघोज येथील मित्रांनी आपले मैत्रीचे कर्तव्य पार पाडत. सर्व वर्गमित्रांनी एकत्र येत 11000 रु.ची मदत मच्छिन्द्र जानकू लामखडे, दत्तात्रय रखमा खोसे या मित्रांकडे सुपूर्द केली.
काही दिवसांपूर्वी कुकडी नदीला पूर आल्याने नदी काठच्या शेतकर्यांचे अतोनात नुकसान होऊन कांदा चाळ, सोयाबीन, जनावरांचा चारा आदीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. ऐन दिवाळीत झालेल्या या नुकसानीमुळे अनेक शेतकर्यांची दिवाळी ही कडू झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
निघोज मधील युवा शेतकरी मच्छिन्द्र जानकू लामखडे यांचे कुकडी नदीला पूर येऊन सोयाबीन वाहून गेले हे वर्गमित्रांना समजले तसेच या सर्वांचा अजून एक जवळचा मित्र दत्तात्रय रखमा खोसे यांची मुलगी आजारी असल्याचे समजले त्यामुळे सर्वांनी मिळून मिळालेल्या मदतीतील काही रक्कम मित्राच्या मुलीच्या आजारपणासाठी दत्तात्रय खोसे यांच्याकडे दिली.
मच्छिन्द्र मंजाभाऊ लाळगे (शिवबा विद्यार्थी संघटना अध्यक्ष ), विष्णू सोजे, मारुती कोकाटे यांनी आपल्या सर्व वर्गमित्रांना मदतीचे आव्हान केले, व 11000 रु. ची मदत सर्व खालील सर्व वर्गमित्रांनी जमा केली. मारुती कोकाटे, सोमनाथ तांबे, मच्छिन्द्र लाळगे, संतोष गायखे, शंतनू वाघमारे, शरद डेरे, प्रदीप झावरे, विष्णू सोजे, सुमित्रा कवाद, सुदर्शन निघोजकर, प्रकाश रोहिदास वराळ, विकास पठारे, रवींद्र ढवण, दत्तात्रय रखमा खोसे, सोपान घोगरे, तनवीर तांबोळी, दिपक लाळगे, महादेव पठारे, संदीप ठुबे, भाऊराव लहिरे, गणेश ज्ञानदेव ढवण, मुन्नाभाई इनामदार, विशाल कवाद, भरत पवार, गणेश शेटे, सुभाष संपत वराळ, आकाश शेठ पटेल, नवनाथ शेटे, सोनाली घोलप, लहू ढवन, अरुण वाजे, योगेश बाबुराव रसाळ, रमेश प्रभाकर लंके, लहू इरोळे, शंकर रसाळ, सागर कारखिले, शुभांगी वराळ, संतोष सुपेकर, योगिनी बेलोटे आदि मित्रांनी वर्गमित्राला सुपूर्त केली.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद