महाराष्ट्र दर्शन न्यूज / गोरेगाव / पारनेर प्रतिनिधी - सागर आतकर
पारनेर तालुक्यातील मॉडेल व्हिलेज गोरेगाव येथे सालाबादप्रमाणे गोरेगावची होममिनिस्टर 2022 आणि हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.मा.श्री.बाबासाहेब तांबे मित्र मंडळाने हा कार्यक्रम आयोजित केला होता.कार्यक्रमाच्या निमंत्रक आणि मॉडेल व्हिलेज गोरेगावच्या प्रथम लोकनियुक्त सरपंच सौ. सुमन बाबासाहेब तांबे यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत शेकडो महिलांनी या कार्यक्रमात सहभागी नोंदवला.
महिलांना हक्काचं व्यासपीठ आणि मनमुराद आनंद लुटण्याचा दिवस उपलब्ध करून दिला पाहिजे, गावाकडच्या आमच्या ग्रामीण भागातील महिलांना वर्षभर शेतात राबताना एक दिवस हक्काचा भेटला पाहिजे, खळखळून हसता आलं पाहिजे, धमाल करता आली पाहिजे, यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असतो. त्यासाठीच हा कार्यक्रम असल्याचे मत सरपंच सौ.तांबे यांनी व्यक्त केले.
सिनेअभिनेते श्री.क्रांती नाना मळेगांवकर आणि त्यांची कन्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित असणारी बाल अभिनेत्री, गायिका सह्याद्री मळे गांवकर प्रस्तुत गोरेगाव ची मिनिस्टर 2022 च्या मानकरी ठरलेल्या सौ.स्वाती खोडदे यांना मनाची पैठणी देण्यात आली. गोरेगवाची माहेरवाशीण असलेल्या खोडदे भाऊबीज साठी माहेर ला आल्या आणि पैठणी जिंकून गेल्या. याचा विशेष आनंद सर्वांनी व्यक्त केला.
कार्यक्रमात हिंदी मराठी गाण्यांच्या ठेक्यावर भन्नाट स्पर्धा रंगल्या होत्या. सलग पाच तास हा कार्यक्रम सुरू होता. गावाकडे रात्री साडेबारा पर्यंत कार्यक्रम सुरू असताना एकही महिला अर्धवट कार्यक्रमातून घरी परतली नाही.विशेष म्हणजे अनेक आजीबाईंनी स्टेजवर कॅट वाक केला.एक 80 वर्षांच्या आजी मुख्य आकर्षण ठरल्या. क्रांती नाना यांना उत्कृष्ट संचलनासाठी तर कु. सहयाद्री ला गायनसाठी प्रेक्षकांमधून अनेक रोख बक्षिसे देण्यात आली.
सुवर्णा चौधरी यांनी सोन्याची नथ, शायदा शेख - मिक्सर, मंदा नरसाळे - प्रेशर कुकर, वृषाली नरसाळे - टेबल फॅन, स्वाती नरसाळे - सिलिंग फॅन, जयश्री वाळुंज - इस्त्री अनेक महिलांना उत्तेजनार्थ व रोख बक्षिसे देण्यात आली. उपस्थित सर्वच महिलांना वाण म्हणून स्टेनलेस स्टील चा टिफिन देण्यात आला. मित्र मंडळाची निर्मिती असणारे "बाबासाहेब तांबे माणूस एक नंबर" हे गाणं देखील या कार्यक्रमात मा.श्री. बाबासाहेब तांबे आणि सहकाऱ्यांच्या उपस्थितीत रिलीज करण्यात आले.
या कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मा.सभापती श्री.बाबासाहेब तांबे, शिवसेना उप जिल्हा प्रमुख रामदास भोसले, मा.पंचायत समिती सदस्य शंकरराव नगरे, सरपंच पंकज कारखिले, मा.सरपंच राजाराम नरसाळे, मा.सरपंच मीराबाई नरसाळे, उपसरपंच पै.दादाभाऊ नरसाळे, मा.चेअरमन शिवाजी शेरकर, साहेबराव नरसाळे, शिवाजी नरसाळे, ग्रामपंचायत सदस्य समींद्राबाई नरसाळे, इंजि.स्मिता काकडे, अनुसया नरसाळे, वंदना नरसाळे, शोभा तांबे, संध्या पातारे, बाबासाहेब तांबे मित्र मंडळाचे सर्व सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन संदीप तांबे यांनी केले. संदीप नरसाळे यांनी उत्कृष्ट साऊंड, मंडप आणि लाईट व्यवस्था केली होती.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद