निघोज येथे श्री. मुलीका देवी विद्यालयाचा इयत्ता दहावी-२००७ चा स्नेहमेळावा पार पडला उत्साहात

0

महाराष्ट्र दर्शन न्यूज / निघोज / पारनेर प्रतिनिधी- सागर आतकर

पारनेर तालुक्यातील निघोज येथे श्री मुलीका देवी विद्या मंदिर निघोज या शाळेचे माजी विद्यार्थी यांनी त्यांच्या सन २००७ ची इयत्ता १० वी बॅचचा माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळाव्याचे आयोजन केले होते. या स्नेहमेळावा कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी श्री. मुलीका देवी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. एकनाथ पठारे सर हे होते. 

या प्रसंगी एकूण ११० ते १२० इतके माजी विद्यार्थी - विद्यार्थीनी हजर होते. स्नेह मेळाव्यासाठी श्री. मुलीका देवी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. एकनाथ पठारे सर, अनाजी दळवी सर, शिंदे सर, घोलप सर, पुजारी सर, मेसे सर, निचित सर,प्रमोद खोसे सर, बाजीराव झावरे सर, तांबोळी मॅडम, पुजारी मॅडम, शेख मॅडम, इनामदार मॅडम, शिपाई श्री. भागवत व निघोज गावातील खाजगी क्लासेस चे बानकर सर, सोनवणे सर असे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले.




यावेळी दोस्तीच्या दुनियेतून कायमचे हरवलेले मित्र यांचे स्मरण करत मित्र अविनाश वराळ( पिन्या) व बापूराव गायकवाड (कान्या) यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.

कार्यक्रमाचे ठिकाणी सामूहिक राष्ट्रगीत गायन करण्यात आले. याप्रसंगी निलेश खोबरे (उद्योजक) व किरण सुपेकर (कार्यकारी सोसायटी संचालक) यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

यावेळी सर्व माजी शिक्षकांनी आपापले मनोगत व्यक्त करून माजी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तर सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी आपापले मनोगत व्यक्त करून शालेय जीवन संपल्यानंतर तब्बल १५ वर्षांनंतर एकमेकांना भेटल्यानंतर जुन्या आठवणींना उजाळा दिला.

यावेळी सर्व शिक्षक व विद्यार्थी विद्यार्थिनी, यांचेसाठी स्नेहभोजनाचे राहुल वराळ (युवा उद्योजक) व बाळासाहेब जगताप (न्यू रोकडेश्वर मेडिकलचे मालक) यांनी सुरेख आयोजन केले होते.

कार्यक्रम निमित्ताने सर्वांनी एकत्र बसून खूप गप्पा गोष्टी करून हितगुज केले व सर्वांच्या मित्र मैत्रिणीचे सुख दुःख जाणून घेतले. २००७ च्या दहावीच्या बॅच मधील मित्र शिवाजी वरखडे या मित्राच्या आजारपणाची समजल्यानंतर त्याला छोटीसी मदत म्हणून इतर कार्यक्रमाला फाटा देत आपल्या मित्रासाठी मदतीचा आधार म्हणून कार्यक्रमासाठी जमा झालेल्या रक्कमेतून खर्च करून उरलेली सर्व रक्कम शिवाजी वरखडे या मित्राला देऊन स्नेह मेळावा कार्यक्रमातून समाजाला चांगला संदेश दिला.

सर्व मित्र मैत्रिणी यांनी कार्यक्रमस्थळी विरंगुळा म्हणून प्रविण शेलार (Pretrochemical Engineer) व रोहिणी रसाळ-देंडगे (Computer Engineer) यांनी सामूहिक गेम ॲक्टिविटिज आयोजित करून एकीचे बळ दाखवून दिले.

यापुढील काळातही एकमेकांना सुख दुःखात सहभागी होऊन त्यांना मदत करण्याबाबत भावना व्यक्त केल्या. स्नेहमेळावा कार्यक्रम यापुढील काळातही दरवर्षी आयोजित करण्यासाठी सर्वांनी इच्छा व्यक्त करून कार्यक्रम व्यवस्थित नियोजन घडवून पार पाडल्याबाबत नियोजन समिती मधील सर्वांचे आभार व्यक्त केले. या स्नेहमेळावा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनाथ रसाळ ( PSI), प्रशांत दिवसे (Computer Engineer) व सुरेखा लंके - नीचीत ( शिक्षिका ) यांनी केले. तर गणेश वराळ ( हर्ष इन्फोटेक व गलोरीयस इंटरनॅशनल स्कूल, निघोज चे संस्थापक ) व निलम कवाद-शेळके (Senior Software Developer) यांनी सर्व प्रमुख पाहुण्यांचे व मित्र मैत्रिणी यांचे आभार मानले.

Post a Comment

0Comments

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

Post a Comment (0)

Google Ads 2


 

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !
To Top