Home Remedies : मासे खाताना घशात काटा अडकल्यावर या गोष्टी करा

0



Arogya Mantra : सुंदर केसांपासून ते चमकदार त्वचेपर्यंत मासे खाण्याचे अनेक फायदे आहे. मासे खायला खूप चविष्ट तर असतातच पण आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असतात. चव आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर असूनही, माशांमध्ये लहान आणि बारीक काटे असल्यामुळे बरेच लोक ते खाणे टाळतात. अनेक वेळा मासे खाताना तोंडात काटा कधी गेला आणि घशात अडकला हे कळत नाही.अशा परिस्थितीत जर तुम्ही पहिल्यांदाच मासे खात असाल किंवा एखादे लहान मूल मासे खात असेल तर त्याला अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.मासे खाताना घशात काटा अडकल्यावर हे उपाय अवलंबवा.

1) शिजवलेला भात -

जर तुमच्या घशात माशाचा काटा अडकला असेल, तर शिजवलेला भात या समस्येवर मात करण्यासाठी चांगला उपाय ठरू शकतो.घशात काटा अडकल्यास ताबडतोब भाताचा गोळा तयार करून न चावता गिळावा.घशात अडकलेला काटा लगेच निघेल.

2) केळी-

मासे खाताना घशात काटा अडकल्यावर केळी खाल्ल्याने खूप आराम मिळतो.अशा वेळी केळीचा तुकडा न चावता थेट गिळा.काटा स्वतःच बाहेर येईल.

3) कोका कोला, पेप्सी यांसारखी थंड पेय प्यावी-

मासोळी खाताना आपल्या गळ्यात काटे अडकले असल्यास कोका कोला सारखे थंड पेय प्यावी. असं केल्याने काटा निघून येतो.

4) कोमट पाण्यात किंवा दुधात ब्रेड मिसळा-

ही प्रक्रिया केळी खाण्यासारखीच आहे. यासाठी ब्रेड घ्या आणि कोमट पाण्यात किंवा दुधात मिसळा. ब्रेड वितळल्यावर हे मिश्रण प्या. अशाप्रकारे, ब्रेड आणि दूध किंवा पाण्याचा मऊपणा घशात अडकलेले काटे काढून पोटात घेऊन जातात.

जर यापैकी कोणताही उपाय तुमच्यासाठी काम करत नसेल तर तुम्ही विलंब न करता डॉक्टरांशी संपर्क साधावा, उशीर केल्यास समस्या वाढू शकते.


Source

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top