महाराष्ट्र दर्शन न्यूज / शिरूर / प्रतिनिधी किरण चौधरी
शिरूर तालुक्यातील आण्णापुर, रामलिंग, सरदवाडी, कर्डेलवाडी, निमगावभोगी, आमदाबाद, म्हसे-बुद्रुक, मलठण या गावांसाठी एकात्मिक पद्धतीने तालुक्यातील मौजे आण्णापुर या ठिकाणी ७ डिसेंबर रोजी सकाळी १०वा. ते सायं ५:३० वाजेपर्यंत शासनाचा अत्यंत महत्त्वपूर्ण उपक्रम महाराजस्व अभियान (शासन आपल्या दारी) हा नावीन्यपुर्ण उपक्रम तालुका तहसिल प्रशासनाच्या वतीने राबवण्यात आला.
तहसिलदार प्रशांत पिसाळ, निवासी नायब तहसीलदार श्रीमती स्नेहा गिरीगोसावी, शिरूर पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, पोलिस उपनिरीक्षक अमोल पन्हाळकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. विविध योजनांची माहिती व लाभ थेट ग्रामस्थरावर शासनाच्या या उपक्रमातून राबवण्यात आली आहे. सदर उपक्रमासाठी प्रचंड प्रतिसाद नागरिकांकडून मिळाला साधारणतः ५५०हून अधिक प्रकरणे दाखल झाली होती. अनेक नागरीकांना या ठिकाणी लाभ मिळाला.
नागरीकांस उत्पन्नाचे दाखले, रेशन कार्ड संबंधित कामे, मतदार यादी कार्ड संबंधित कामे, महावितरण नवीन विद्युत मीटर जोडणी संबंधित कामे आणि टपाल खात्याचे ३९९ मध्ये दहा लाख रुपये विम्याचे संरक्षणसाठी विमा काढण्याची कामे, आधार संबंधित कामे मोठया प्रमाणात झाली आहे. तसेच गरजू विधवा महिलांना तातडीने लगेच अर्ज आल्यानंतर जागेवरच विद्युत मिटर त्यांना वितरित करण्यात आल्याने विधवा महीलांना मनापासून आंनद झाला.
नमूद गावातील सर्व तलाठी, मंडळ अधिकारी, रेशन दुकानदार, कृषी अधिकारी, आरोग्य विभाग, आधार कार्ड, मतदान कार्ड, विधवा व वयोवृद्ध पेन्शन, निराधार बालक पेन्शन तसेच विविध प्रकारच्या शासनाच्या सर्व योजना एकाच छताखाली नागरिकांना मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे.
यापुढील काळात मान्यवरांचे सहकार्यातून आणि प्रशासनाकडून असेच अराजकीय उपक्रम यापेक्षा अधिक भव्य स्वरूपात घेऊन नागरीकांस जास्तीत जास्त लाभ कसे मिळतील यासाठी प्रयत्न करणार आहोत. तसेच तालुका प्रशासनाने ही कालचा कार्यक्रमाचे भव्य स्वरूप व नियोजन पाहिल्यानंतर असे मत व्यक्त केले की आजचा उपक्रम पाहिल्यानंतर आम्ही असे उपक्रम घेण्यासाठी अधिक प्रयत्न करू, यामुळे नागरिकांना अधिक फायदा होईल. - निलेश वाळुंज (सामाजिक कार्यकर्ता)
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद