महाराष्ट्र दर्शन न्युज / शिरूर / प्रतिनिधी किरण चौधरी
रांजणगाव गणपती येथे बुधवार (दि.७) शिवसेना पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात मनसेचे शहराध्यक्ष अविनाश घोगरे यांनी पुणे जिल्हा संपर्क प्रमुख आ. सचिन अहिर यांच्या हस्ते घोगरे यांना शिवबंधन बांधण्यात आले. घोगरे हे गेल्या चार वर्षांपासून मनसेचे शहराध्यक्ष होते. त्यापूर्वी विद्यार्थी सेनेचे देखील ते शहराध्यक्ष होते. त्यांनी विविध प्रश्नांसंदर्भात आंदोलने केलेत वीज प्रश्नासंदर्भात २०२० मध्ये वीज वितरण कार्यालयाची तोडफोड करत त्यांनी आंदोलन केले होते. पक्ष प्रवेशानंतर एक सामान्य शिवसैनिक म्हणुन काम करणार असून पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशप्रमाणे तालुक्यातील विविध प्रश्नासंदर्भात आवाज उठवणार असल्याचे यावेळी घोगरे यांनी सांगितले, यावेळी पुणे जिल्हा संपर्क प्रमुख आ सचिन अहिर, उपनेते विभागीय समन्वयक रवींद्र मिर्लेकर, जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर कटके, तालुका प्रमुख पोपटराव शेलार, जिल्हा संघटक संजय देशमुख शहर प्रमुख सुनील जाधव यांसह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद