महाराष्ट्र दर्शन न्युज / शिरुर / प्रतिनिधी किरण चौधरी
तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील फ्रेसोनिअस काबी या कंपनी विरोधात सोमनाथ भगत यांनी मानवी हक्काचे उल्लंघन होत असल्याने या कंपनी व्यवस्थापनाच्या विरोधात शिरुर तहसील कार्यालयासमोर न्याय मिळण्यासाठी आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. त्यांच्या या उपोषणाला राजकीय त्याचबरोबर भीम आर्मी भारत एकता मिशनच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला होता. दरम्यान उपोषणकर्त्यांच्या मागण्या पुणे येथील सहायक कामगार आयुक्त एम. ए. मुजावर यांनी कामगारांच्या अटी मान्य केल्याने हे उपोषण थांबविण्यात आले आहे.
सविस्तर...
शनिवार (दि 10) पासुन सोमनाथ भगत यांनी शिरुर तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरवात केली होती. भगत यांसह कंपनीचे इतर कर्मचारी हे भारत एकता मिशन यांच्या भीम आर्मीचे सदस्य असल्याने भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सिताराम गंगावणे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष रियाज शेख, शिरुर तालुका प्रभारी संदिप शेलार, शिरुर तालुकाध्यक्ष अजित नरवडे, शिरुर तालुका महिलाध्यक्ष दिपिका भालेराव, महिला नेत्या मंजुषा कुलकर्णी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी या उपोषणाला पाठिंबा दर्शवला होता.
शिरुरचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, नायब तहसीलदार स्नेहा गिरीगोसावी यांनी या आंदोलकांची भेट घेत कामगार आयुक्त यांच्याशी याबाबत पाठपुरावा केला होता. तसेच जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे, मानव विकास परीषदेचे प्रदेशाध्यक्ष संदीप कुटे, ठाकरे गट युवासेनेचे जिल्हाध्यक्ष संदीप शिंदे, ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख पोपट शेलार, उपतालुका प्रमुख अनिल पवार आदी विविध पक्षाच्या राजकीय नेत्यांनीही उपोषण करणाऱ्या कामगारांची भेट घेऊन पाठिंबा दिला होता.
त्याच अनुषंगाने सोमनाथ भगत यांच्या उपोषणाची तातडीने दखल घेत सहायक कामगार आयुक्त एम. ए. मुजावर यांनी कामागारांच्या मागण्या व अटी मान्य केल्या असल्याने हे उपोषण सोडण्यात आले. यावेळी पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सिताराम गंगावणे, शिरूर तालुका प्रभारी संदिप शेलार, शिरूर तालुकाध्यक्ष दिपिका भालेराव, महिला नेत्या मंजुषा कुलकर्णी, मानव विकास परीषदेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष संदीप कुटे आदी उपस्थित होते.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद