महाराष्ट्र दर्शन न्युज/शिरूर/प्रतिनिधी-किरण चौधरी
इंडिया इंटरनॅशनल सेंटर दिल्ली येथे 22 जानेवारीला पराक्रम दिवसाचे औचित्य साधून ओयासिस वर्ल्ड रेकॉर्ड कडून इंडियन ग्लोरी पुरस्काराने महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील गणेश तुकाराम पुंडे यांना सन्मानित करण्यात आले.
गणेश पुंडे यांना त्यांच्या सामाजिक, साहित्यिक, योगदानाबद्दल ओयासिस वर्ल्ड रेकॉर्ड कडून इंडियन ग्लोरी अवॉर्ड फिलिस्टीन देशाचे राजदूत अदनान अबू अलहैजा आणि बुरुण्डीचे कौन्सलर चार्ल्स रवांडा यांच्या हस्ते इंडिया इंटरनॅशनल सेंटर दिल्ली येथे प्रदान करण्यात आला. प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून गणेश पुंडे यांच्या कार्याबद्दल दिला जाणारा बहुमान प्रदान करताना मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून फिलिस्टीन देशाचे राजदूत अदनान अबू अलहैजा, बुरुण्डी चे कौन्सलर चार्ल्स रवांडा तथा सुभाष चंद्र बोस यांचे नातू सोमनाथ बोस, मेजर जनरल डॉ राजन कोचर, लिबिया माल्ता चे माजी राजदूत अनिल त्रिगुनियत, प्रो राजबीर सिंग, व्ही सी एम डी यू रोहतक, पद्मश्री विजय कुमार शहा सांगली, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे महाराष्ट्र चे संस्कृत व योगा विभाग प्रमुख डॉ.अभिजित जोशी, अमित्य विद्यापीठाचे कौन्सलर डॉ सेवामूर्ती हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाला आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय स्तरातून देशभरातील विविध राज्यातून पुरस्कार्थी उपस्थित होते. या वेळी ए.पी.जे अब्दुल कलाम अवॉर्ड, नेताजी सुभाषचंद्र बोस अवॉर्ड, जीवन गौरव पुरस्कार, भारतीय रत्न अवॉर्ड, इंडियन ग्लोरी अवॉर्ड अशा विविध पुरस्काराने देशभरातील जवळपास शंभर पुरस्कार्थीना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, गौरव पत्र देऊन सन्मानित करण्यात आले अशी माहिती ओयासिस वर्ल्ड रेकॉर्ड च्या चेअरमन डॉ सुषमा यांनी दिली.
कार्यक्रमाच्या सुरवातीला विविध देशातून आलेल्या राजदूतांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. दिपज्योत प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरवात झाली. आंतरराष्ट्रीय जादूगार सी पी यादव यांच्या जादूच्या प्रयोगाने कार्यकामात रंगत आणली. ओयासिस वर्ल्ड रेकॉर्ड च्या टीम कडून राष्ट्रीय पातळीवर दर्जेदार कार्यक्रम घेऊन यशस्वी रित्या पार पाडला याबद्दल टीम चे कौतुक होत आहे.
या यशस्वी कार्यकामाचे निवेदन मिस. ओयासिस व प्रसिद्ध मिमिक्री आर्टिस्ट अमित गुप्ता यांनी केले. ओयासिस वर्ल्ड रेकॉर्ड च्या चेअरमन डॉ. सुषमा यांनी आलेल्या सर्व पुरस्कार्थी आणि मान्यवरांचे आभार मानले.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद