निघोज ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध

0




महाराष्ट्र दर्शन न्यूज / निघोज / प्रतिनिधी सागर आतकर

निघोज ग्रामीण संस्था परिवाराचे मार्गदर्शक कै. बाबासाहेब कवाद संस्थापक असलेल्या बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्थेची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच बिनविरोध झाल्याने सहकार पतसंस्था चळवळीतील मान्यवरांनी पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत कवाद, उपाध्यक्ष नामदेवराव थोरात व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

ठेवी १९१ कोटी, कर्जवाटप १२१ कोटी, गुंतवणूक ११० कोटी अशाप्रकारे जिल्ह्यातील पतसंस्था चळवळीत अग्रगण्य असलेल्या पतसंस्थेच्या आजपर्यंतच्या सर्व निवडुका बिनविरोध झाल्या आहेत.


सहकारातील महामेरु बाबासाहेब कवाद यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी या पतसस्थेची पंचवीस वर्षांपूर्वी स्थापना करुन शिरुर व पारनेर तालुक्यात शाखा स्थापन करुन ग्रामीण भागातील आर्थिक विकासाला मोठ्या प्रमाणात पाठबळ देउन सर्वसामान्य जनता,व्यवसायीक, औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी मोठे योगदान दिले आहे. कवाद यांनी २२ वर्षं संस्थेचे चेअरमन म्हणून काम करताना सहकाराची निस्वार्थी सेवा केली आहे. गेली तीन वर्षांच्या प्रत्येक वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेला बाबासाहेब कवाद यांचे नाव देण्याची मागणी सभासद मोठ्या संख्येने करीत होते. गेली महिनाभरात संस्थेचे नामकरण बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्था केल्याबद्दल सभासद, ग्रामस्थ,ठेवीदार यांनी आनंद व्यक्त केला आहे.


निघोज ग्रामीण सहकारी पतसंस्था परिवाराचे मार्गदर्शक कै. बाबासाहेब कवाद हे संस्थापक असलेल्या श्री. बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. गेली पंचवीस वर्षापूर्वी जी एस महानगर बँकेचे माजी उपाध्यक्ष बाबासाहेब कवाद व त्यांच्या सहकाऱ्यांनी या पतसंस्थेची स्थापना केली होती. गेली तीन वर्षापासून वसंत कवाद सर हे संस्थेचे चेअरमन म्हणून काम पाहत होते. 

पुन्हा एकदा निघोज ग्रामीण सहकारी पतसंस्था संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली.


संचालक मंडळ;याची नावे पुढील प्रमाणे:

संचालक वसंत कवाद, नामदेव थोरात, चंद्रकांत लामखडे, अँड. बाळासाहेब लामखडे, दामुशेठ लंके, बाबाजी कळसकर, बाळशिराम डेरे, अभिजित मासळकर, भिवाशेठ रसाळ, सतीश साळवे, दिलीप सोदक, लताबाई कवाद, वैशाली कवाद

यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक गणेश औटी यांनी काम पहिले. तर पतसंस्थेचे मुख्य व्यवस्थापक दत्तात्रय लंके यांनी सहायक म्हणून काम पहिले. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top