महाराष्ट्र दर्शन न्यूज / निघोज / प्रतिनिधी सागर आतकर
पारनेर तालुका पत्रकार संघ,आपला गणपती गणेश मित्र मंडळ व ग्रामस्थ आयोजित अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत निघोजचा मळगंगा युवा साईधाम क्रिकेट संघ प्रथम विजेता बेल्हे ता. जुन्नर येथील मोरया क्लब क्रिकेट संघ द्वितीय तसेच आपला गणपती मित्र मंडळ क्रिकेट संघाला तृतीय पारितोषिक व निघोज येथील सुखकर्ता क्रिकेट संघाला चौथे पारितोषिक देण्यात आले आहे. मॅन ऑफ मॅचचा किताब ओमकार श्रीमंदीलकर यांनी पटकाविला तसेच सर्वोत्तम खेळाडू हा किताब आदेश वराळ यास देण्यात आला.
यावेळी संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ, वडझिरे येथील मनसेचे शाखाध्यक्ष विकास मोरे, शिरूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते, पारनेर तालुका पत्रकार संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक दत्ता उनवणे, तालुका पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष ईधाटे, सहसचिव भास्करराव कवाद, पारनेर तालुका मराठी पत्रकार संघाचे सहसचिव बाबाजी वाघमारे, पत्रकार आनंद भुकन, विजय रासकर, सागर आतकर, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मंगेशशेठ लाळगे, भाजपाचे जिल्हा सांस्कृतिक विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष विलासराव हारदे, निलेश घोडे, पतसंस्थेचे संचालक सतिष साळवे, मिनीनाथ कवाद, बाबाजी तनपुरे, आकाश वराळ, देवीदास पवार, प्रसिद्ध समालोचक लहुशेठ साबळे, आपले गाव गणपती गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष रवि रणसिंग, सचिव रोहित पठारे तसेच त्यांचे सर्व सहकारी यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत तीन दिवसांत दोनशे पेक्षा जास्त खेळाडू सहभागी झाले होते. यावेळी गणपती चषक व विजेत्या संघाला वीस हजार रुपयांची रोख पारितोषिक देण्यात आली. आपले गाव गणपती गणेश मित्र मंडळ व पारनेर तालुका पत्रकार संघातील सर्व सदस्यांनी या क्रिकेट स्पर्धा यशस्वी होण्यासाठी परीश्रम घेतले.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद