श्री संत सद्गुरू निष्ठ निळोबाराय महाराज यांच्या २७० व्या संजीवनी समाधी सोहळा निमित्त नियोजन बैठक

0

     


महाराष्ट्र दर्शन न्यूज / पिंपळनेर / प्रतिनिधी -संदीप गाडे

अहमदनगर जिल्ह्यातील प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाणारे पारनेर तालुक्यातील श्रीक्षेत्र पिंपळनेर येथील महाराष्ट्रातील पाचवे संत म्हणून ओळखले जाणारे श्री संत सद्गुरुनिष्ठ निळोबाराय महाराज यांच्या संजीवनी समाधीच्या २७० व्या कीर्तन महोत्सव सोहळ्याच्या निमित्त आयोजित बैठक सोहळा बुधवार दिनांक ८ फेब्रुवारी २०२३ रोजी बैठक संपन्न होणार आहे.

पिंपळनेर येथील श्री संत निळोबाराय भक्तनिवास या ठिकाणी प्रांत अधिकारी सुधाकर भोसले पारनेर तहसीलदार शिवकुमार आवळकुंठे निळोबाराय देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष ज्ञानदेव माऊली पठारे, निळोबाराय वंशज  पायी दिंडी सोहळा प्रमुख गोपाळ काका मकाशिर व सर्व शासकीय प्रमुखांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न होणार आहे .



अशी माहिती निळोबाराय देवस्थान ट्रस्ट कार्याध्यक्ष अशोकराव सावंत यांनी दिली असून या बैठकीस सर्व पायी दिंडी सोहळा प्रमुख वारकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top