खाजगी लॅबमध्ये ५ हजार रूपये खर्च येणाऱ्या चाचण्या मात्र कृषी गंगा प्रदर्शनात मोफत करण्यात येणार

0

महाराष्ट्र दर्शन न्यूज / पारनेर / प्रतिनिधी सागर आतकर : 

पारनेर-नगर मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांच्या पुढाकारातून मतदारसंघातील नोंदणीकृत बांधकाम कामगारांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. 



दोन फेब्रुवारीपासून सुरु झालेली ही तपासणी मोहिम पाच फेब्रुवारी पर्यंत सुरु राहणार आहे. या शिबिरात खाजगी लॅबमध्ये ५ हजार रूपये खर्च येतो त्या चाचण्या या शिबिरात मोफत करण्यात येणार आहेत. 

या शिबिरात ऑडियन स्क्रीनिंग टेस्ट शुध्द टोन ऑडिओग्राम, दृष्टी स्क्रीनिंग चाचणी, सी. बी.सी चाचणी, रक्तातील साखरेची चाचणी, यकृत कार्य चाचण्या, मुत्रपिंड कार्य चाचण्या, लिंपिड प्रोफाईल, मलेरिया परजिवी, ईएसआर, टी थ्री टी फोर टीएसएच, सिरम लोह, जीजीटीपी, मॅग्नेशियम या चाचण्या मोफत करण्यात येणार आहेत. ५ फेब्रुवारी दरम्यान सकाळी ११ ते ५ दरम्यान पार पडणारे हे शिबीर कृषी उत्पन्न बाजार समिती शेजारील मैदानावरील राज्यस्तरीय कृषी गंगा प्रदर्शनात आयोजित करण्यात आले आहे. 

शिबिराचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांनी रूग्णाचे आधार कार्ड, बांधकाम कामगार नोंदणी पावती किंवा बांधकाम कामगार कार्ड ही कागदपत्रे घेऊन हजर राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व निलेश लंके प्रतिष्ठाण यांच्या वतीने करण्यात आले आहे. 

मतदारसंघातील शेतकरी, शेतमजुर तसेच वंचित घटकांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आ. निलेश लंके हे नेहमीच पुढाकार घेत असतात. विविध शस्त्रक्रिया करण्यासाठी आ. लंके यांनी आजवर राज्यभरातील अनेक रूग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून भरीव आर्थिक मदत मिळवून दिली आहे. नोंदणीकृत बांधकाम कामगरांच्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजनही त्याच हेतूने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top