शिक्षकांनी शाळेच्या वेळात मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावे.. शिवबा संघटनेची मागणी

0

महाराष्ट्र दर्शन न्यूज / निघोज 

शिरूर  माळवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत माळवाडीचे सरपंच व शिवबा संघटनेचे तालुका अध्यक्ष सोमनाथ भाकरे यांनी अचानक भेट दिली असता वर्गामध्ये विद्यार्थी एका बाजुला वेळ घालवत असताना बसलेले दिसले आणि मुख्याध्यापक हातात मोबाईल घेऊन त्या मोबाईलमध्ये व्यस्त असल्याचे दिसून आले. त्यावेळी सबंधीत शिक्षकांना तुम्ही विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष करत आहात आणि मोबाईलमध्ये व्यस्त आहात असे विचारणा केली असता, आमची बी एल ओ ची ऑनलाइन मिटींग आहे त्यामुळे वरिष्ठ अधिकारी यांच्या आदेशानुसार मला ऑनलाईन मिटींगला हजर राहावे लागते. असे उत्तर मिळाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश आल्यानंतर आम्हांला प्रत्येक कामाला वेळ दयावा लागतो. त्यामुळे आम्हांला विद्यार्थ्यांकडे पुर्णवेळ लक्ष देता येत नाही.असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.


सुरू असलेला हा प्रकार विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या बाबतीत गंभीर स्वरूपाचा असुन, हा प्रकार नुसता माळवाडी गावापुरता मर्यादित नसून संपूर्ण शिरूर व पारनेर तालुक्यामध्ये ही परिस्थिती आहे. म्हणूनच शिक्षण विभागाकडून शिक्षकांवर शालेय वेळेमध्ये जर अशा प्रकारचा वाढीव भार देण्यात येत असेल आणि यामुळे शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असेल तर आम्ही ही बाब कधीही सहन करून घेणार नाही. अशा प्रकारचे निवेदन शिवबा संघटनेकडून शिरूर गटविकास अधिकारी यांना देण्यात आले. यावेळी सरपंच सोमनाथ भाकरे, माऊली घोडे, शिवबा युवक तालुकाप्रमुख केशव शिंदे उपस्थित होते.


शिक्षकावरील शालेय वेळेत शाळेविरहित शासकीय कामामुळे विदयार्थ्यांच्या गुणवत्तेवर परीणाम होत आहे. तरी यासंदर्भात राज्य शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे शिवबा संघटना अध्यक्ष अनिल शेटे यांनी सांगितले.


पत्राची शिक्षण विभागाकडून योग्य ती दखल घेण्यात यावी अन्यथा संघटना तीव्र आंदोलन करेल. असे या निवेदनात म्हटले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top