महाराष्ट्र दर्शन न्यूज / निघोज /प्रतिनिधी - सागर आतकर
पारनेर तालुक्यातील निघोज येथील कन्हैय्या उदयोग समुह आयोजित भव्य किर्तन सोहळा आज पासुन सुरु झाला. किर्तनसोहळ्याचे हे २६ व्या वर्षे आहे. महाराष्ट्रातील सुप्रसिध्द किर्तनकारांचे किर्तन ऐकण्यासाठी अहमदनगर व पुणे जिल्हयातुन दररोज हजारो भाविक येत असतात. ह.भ.प.संतोष महाराज पुजारी यांनी एकनाथी भारुडातुन मनोरंजनाबरोबर समाजप्रबोधन केले. तरुणांनी व्यसनाधीनतेपासुन दुर राहुन स्वतःमध्ये धार्मिक आवड निर्माण करावी. आजचा सक्षम तरुण हीच भारताची खरी राष्ट्रीय संपत्ती आहे. कन्हैय्या उदयोग समुहाची भरभराट होत असताना लंके परिवार हा आपल्या प्रगतीबरोबर भव्य किर्तनसोहळा व अन्नदानाचा कार्यक्रम आयोजन करत आहे. हाच लंके परिवाराचा मोठेपणा आहे.
जेथे देण्याची परंपरा आहे त्यांना परमेश्वर काहीच कमी पडु देत नाही.हेच कन्हैय्या परिवाराच्या प्रगती वरुन दिसुन येते.- ह.भ.प.संतोष महाराज पुजारी
किर्तन ऐकण्यासाठी आलेल्या सर्व भाविकांचे स्वागत कन्हैय्या उदयोग समुहाचे सीईओ मच्छिंद्र लंके, संस्थापक शांताराम मामा लंके व बबन मामा लंके यांनी केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कन्हैय्या उदयोग समुहाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.
आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद