जीवनात आपल्याकडे संयम, कष्ट करण्याची तयारी असेल तर आपल्याला यशापासुन कोणीच रोख शकत नाही.- ह.भ.प.मधुकर महाराज सायाळकर

0



महाराष्ट्र दर्शन न्यूज / निघोज / प्रतिनिधी सागर आतकर

     पारनेर तालुक्यातील निघोज येथे कन्हैय्या उदयोग समुहाच्या किर्तनसोहळ्यात आज दुसऱ्या दिवशी ह.भ.प.मधुकर महाराज सायाळकर यांची किर्तनसेवा झाली. यावेळी सायाळकर महाराज आपल्या किर्तनसेवेत भाविकांना म्हणाले, भर पावसातही आपण आलात. तुम्ही एवढेच लक्षात ठेवा. दुसऱ्यांच्या प्रगतीमध्ये समाधान माना आपणही मोठे व्हाल. धार्मिक क्षेत्र आपल्याला समाधाना बरोबर प्रगतीचा महामंत्र देते. 

जीवनात आपल्याकडे संयम, कष्ट करण्याची तयारी असेल तर आपल्याला यशापासुन कोणीच रोख शकत नाही. आपली प्रगतीची दिशा सरळ असेल संकटांना घाबरु नका. राम नावाचा जप करा.- ह.भ.प.मधुकर महाराज सायाळकर

लंके परिवाराने कन्हैय्या उदयोग व्यवसायाच्या माध्यमातून देशभरात विस्तार करत असतानी प्रशासन, उदयोजक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात मोठा मित्रपरिवार निर्माण केला. यामागे नक्कीच त्यांचा स्वभाव व मोठा त्याग आहे. जीवनात त्याग असेल तर कोणतीच गोष्ट अशक्य नाही. हे लंके परिवाराने आपल्या सेवाभावी कार्यातुन दाखवुन दिले. काही वर्षापूर्वीचा कन्हैय्या उदयोग समुहाचा विस्तार आज एवढा मोठा झाला. यामागे नक्कीच या परिवाराचे अपार कष्ट आहेत.

किर्तन ऐकण्यासाठी अहमदनगर पुणे जिल्ह्यातून आलेल्या सर्व भाविकांचे स्वागत कन्हैय्या उदयोग समुहाचे सीईओ मच्छिंद्र लंके, संस्थापक शांताराम लंके व बबन लंके यांनी केले. सुत्रसंचालन सोमनाथ वरखडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी कन्हैय्या उदयोग समुहाचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

आपण दिलेल्या सुचनेबद्दल धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा (0)

Google Ads 2




 

To Top